इंदापूर तालुक्यातील युवा नेते पार्थ निंबाळकर; दरवर्षी स्वतः रक्तदान करून आणि रक्तदान शिबिरे घेऊन जोपासतात सामाजिक बांधिलकी!

Spread the love

इंदापूर | इंदापूर तालुक्यातील भवानीनगर परिसरातील युवा नेते पार्थ निंबाळकर दरवर्षी स्वतः रक्तदान करून आणि रक्तदान शिबिरे घेऊन सामाजिक बांधिलकी जोपासत आहेत..होय?
स्वतःहा आजपर्यंत १२ वेळा रक्तदान करून दरवर्षी सनसर व भवानीनगर भागात रक्तदान शिबिराचे आयोजन करून ६०० ते ७०० बॉटलचे रक्तसंकलन करतात हा त्यांचा दरवर्षीचा छोटासा सामाजिक कार्याचा प्रयत्न असतो. असंख्या मित्र परिवारासोबत रक्तदान करून वाढदिवस साजरा करतात हे त्यांचे मोठेपण. याहीवर्षी त्याच्यावरती प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते व मित्रपरिवार यांनी मिळून एका दिवसामध्ये १५९ लोकांनी रक्तदान केले हा आजपर्यंतचा भवानीनगर व सणसर परिसरातील रक्तदानाचा विक्रमी आकडा मनाला जात आहे.

माजी चेअरमन विद्यमान संचालक सणसर विविध कार्यकारी सहकारी सोसायटी ग्रामपंचायत सदस्य सणसर माननीय श्री पार्थ बाबा दत्तात्रय निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त भरवण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ शिवाजी अण्णा रायते यांच्या हस्ते झाले व या कार्यक्रमाला सणसर चे जेष्ठ विजयसिंह आबा निंबाळकर संजय भैय्या निंबाळकर सणसर चे सरपंच रंजीत भैय्या निंबाळकर कारखान्याचे संचालक दीपक आप्पा निंबाळकर हेमंत राव निंबाळकर सोसायटीचे चेअरमन वसंतराव जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे आयोजन पार्थ बाबा निंबाळकर मित्र परिवार यांनी केले होते यावेळी परिसरातील लोकांनी उदंड असा प्रतिसाद दिला या रक्तदान शिबिरात 159 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट कमिटी यांचे विशेष मोलाचे सहकार्य लाभले.

दरवर्षी श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट कमिटीच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडला जातो व त्याचप्रमाणे रक्तदात्यांना वर्षभर रक्ताच्या बॅगेची गरज लागल्यास पार्थ निंबाळकर व शिवशंभू ट्रस्ट उपलब्ध हि करून देत आहेत म्हणूनच हाच विश्वास ठेवत आजही लोक रक्तदान करत आहेत.

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.