मांजरा धरण 86 %भरले मांजरा नदीकाठावरील ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा

Spread the love

 

परवेज मुल्ला
उस्मानाबाद | मांजरा धरण रविवारी सायंकाळपर्यंत 86% भरले आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार धरणक्षेञात एखादा मोठ्ठा पाऊस पडला, तर हे धरण कोणत्याही क्षणी 100% भरू शकते. त्यावेळी खबरदारीचा उपाय म्हणून धरणाचे दरवाजे उघडावे लागू शकतात. ही शक्यता लक्षात घेऊन मांजरा नदी काठावरील शेतकरी, ग्रामस्थांनी सतर्क रहावे.

नदीपाञात पोहणे, नदीकाठावर जनावरे बांधणे किंवा चारण्यास नेणे टाळावे. तसेच धरणाचे दरवाजे उघडल्यास ते पाहण्यासाठी जाणे, पाण्याच्या प्रवाहात उतरणे असे प्रकार नागरीकांनी करू नयेत. त्याचबरोबर एखाद्या पुलावरून पाणी वाहत असल्यास त्यातून वाहन नेणे, पूल ओलांडणे टाळावे. संभाव्य पाऊस, पूरपरीस्थिती लक्षात घेऊन आपण सतर्क रहावे, तसेच इतरांनाही सतर्क करावे.असे आवाहन लातुरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी,जी. श्रीकांत यांनी केले आहे.

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.