मुख्यमंत्री उद्धव ठाकरे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; जागेवरच नुकसानग्रस्तांना केले धनादेश वाटप, फडणवीसांवर केली सडकून टीका!

Spread the love

सोलापूर | राज्यावर अस्मानी संकट कोसळले असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बाहेर पडत नाही अशी टीका विरोधकांनी केली होती. पण, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले असून तातडीने मदतकार्य करण्यास सुरुवातही केली आहे. नुकसानग्रस्तांना धीर देत मुख्यमंत्र्यांना 10 लाखांची प्रातिनिधिक मदत दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. आज सोलापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थिती पाहणी दौऱ्यादरम्यान अक्कलकोट तालुक्यातील बोरी नदी परिसरात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी आणि ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांना धीर दिला.

तसेच देवेंद्र फडणवीस यांना बिहारला गेलाच आहात तर पुढे दिल्ली जावे, निदान पंतप्रधान मोदी हे तरी बाहेर पडतील’, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे. ‘कुणीही राजकीय चिखलफेक करण्याची गरज नाही. सध्या महाराष्ट्रावर मोठे संकट कोसळले आहे. पण, विरोधी पक्ष नेते हे बिहारला प्रचाराला जात आहे. देवेंद्र फडणवीस हे बिहारला प्रचाराला गेले, त्यांनी आता पुढे जाऊन दिल्लीला जावे, जर दिल्लीला गेले तर पंतप्रधान मोदी सुद्धा बाहेर पडतील, असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

मुख्यमंत्र्यांचे  सांगवी खूर्द येथे आगमन झाले. नैसर्गिक आपत्तीमुळे पडझड झालेल्या घरांची पाहणी केली आणि ग्रामस्थांशी चर्चा केली. या भागात 150 घरांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी  पूरग्रस्तांना  प्रातिनिधिक स्वरूपात मदत म्हणून 11 धनादेशांचे वाटप केले आहे.  पडझड झालेल्या प्रत्येक घराला 95 हजारांची मदत देण्यात आली आहे. अक्कलकोट, बोरी नदी, रामपूर, बोरी उमरगे या पूरग्रस्त भागांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिवसभर पाहणी करणार आहेत. पूरग्रस्त भागातील मदतकार्य तसेच नुकसान भरपाई देण्यासाठी तात्काळ आवश्यक ते पंचनामे कागदपत्रांच्या फारशी शहानिशा न करता पूर्ण करण्याचे आदेश आधीच मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहे. आज सोलापूर जिल्ह्याचा पूरग्रस्त भागांचा दौरा पुर्ण केल्यावर बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उस्मानाबाद जिल्ह्यातील पूरग्रस्त  भागाचा दौरा करणार आहेत.

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.