राज ठाकरेचा जिम व्यावसायिकांना पाठींबा; सरकारला धरले धारेवर!
मुंबई | कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता केंद्र सरकारसह राज्य सरकारने राज्यात लॉकडाऊन जाहीर केला होता. त्यामुळे अनेक व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली. विस्कटलेली अर्थिक घडी सरळ करण्यासाठी लॉकडाऊन शिथिल करत नियम व अटींसह काही व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. मात्र, जिम व्यावसायिकांना अद्याप कोणताच दिलासा मिळालेला नाही. या पार्श्वभूमीवर जिम व्यवसायिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे धाव घेत मदतीची मागणी केली. यावेळी राज ठाकरे यांनी जिम सुरु करा, कोण कारवाई करतंय बघू, असा आदेशव जा इशारा दिला. नियम व अटींसह अनेक व्यवसाय सुरू करण्यास शासनाने परवानगी दिलेली आहे. त्या अनुषंगाने जिम सुरु करण्यासप रवानगी देण्यात यावी, अशी मागणी जिम चालक आणि मालकांनी केली आहे. मात्र तरी देखील सरकारकडून जिम सुरु करण्याबाबत निर्णय घेतला जात नाही. आपली ही व्यथा जिम व्यवसायिकांनी राज ठाकरे यांच्यासमोर मांडल्या.
◆ राज ठाकरे काय म्हणाले?
सर्व नियमांचे पालन करुन जिम व्यवसाय सुरु करण्यासाठी तयार असल्याचे जिम चालकांनी राज ठाकरेंना सांगितले. यानंतर तुम्ही जिम सुरु करा. जिम सुरु केल्यानंतर कोण कारवाई करतंय बघू, असे राज ठाकरेंनी सांगितले. तसेच विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशीही माझी चर्चा झाली आहे. जिम सुरु झाले पाहिजे असे त्यांचेही म्हणणे आहे. आता मी सांगतोय जिम सुरु करा, ज्याला यायचे आहे, तो जिमला येईल. बघू काय होतेय, असे राज ठाकरे जिम चालक-मालक यांच्या भेटीनंतर म्हणाले. केंद्र सरकार सांगते जिम सुरु करा, विमानतळ सुरु करायला सांगितले, राज्य सरकार म्हणते आम्ही नाही करणार, मग तुम्हाला काही वेगळी अक्कल आहे का, असा सवाल राज ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच जिम सुरु केल्यानंतर प्रत्येकाने आपली काळजी घ्यावी, केंद्राने गाईडलाईन्स दिल्या आहेत, त्या पाळून काळजी घ्यावी असे आवाहनही राज ठाकरे
यांनी केले आहे.