महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि त्यांचा मुलगा पदाचा गैरवापर करत आहेत; निलेश राणे यांनी केला आरोप!

Spread the love

रत्नागिरी | अभिनेता सुशांतसिंह राजपुतच्या आत्महत्येचे प्रकरण अधिकच चिघळत चालले आहे. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात अनेक राजकीय नेत्यांनी उडी घेत परखड मत व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, सुशांतच्या आत्महत्येला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे चिरंजीव आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे जबाबदार असल्याचा आरोप भाजप नेते निलेश राणे यांनी केला आहे. आणि त्यामुळे या दोघांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागेल, असा दावा राणे यांनी ट्विट करत केला आहे.

निलेश राणे यांनी ट्विटरवरुन उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. “उद्धव ठाकरे तुमच्या मुलाचं नाव सुप्रीम कोर्टाच्या रेकॉर्डमध्ये आले…की आदित्य ठाकरे यांचा सुशांत सिंह राजपूतच्या केसमध्ये सहभाग जाणवतो. तुम्हाला आणि तुमच्या मुलाला लवकरच राजीनामा द्यावा लागेल कारण ह्या केसमध्ये तुम्ही आणि तुमच्या मुलाने पदाचा दुरुपयोग केला आहे,” असे निलेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत याचे आत्महत्या प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. दरम्यान, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाशी आदित्य ठाकरेंचा काहीही संबंध नाही. हिंमत असेल तर भाजपच्या लोकांना जाहीरपणे त्यांचे नाव घ्यावे. ते चांगले काम करत आहेत, मदत करत आहेत. बदनामी करण्याची मोहीम सुरु असून हे चांगले राजकारण नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.