मराठा आरक्षण; महाराष्ट्रातील खासदारांनी घेतली घेतली खा. संभाजीराजे यांची भेट
नवी दिल्ली | मराठा आरक्षण मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी खा.सुजय विखे पाटील यांच्यासह खासदार उन्मेष पाटील, खासदार रक्षाताई खडसे, खासदार हीनाताई गावित, खासदार प्रितमताई मुंडे, खासदार भारतीताई पवार खासदार संभाजीराजे यांची भेट घेतली.
मराठा आरक्षणा विषयी चर्चा करण्यासाठी मा.शरद पवार साहेबांनी मला निमंत्रित केले होते. त्याप्रमाणे दिल्ली येथील त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली.
यावेळी मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नी गट, तट, पक्ष न पाहता सर्वांनी एकत्र आल पाहिजे हिच भुमिका प्रभावीपणे मांडली. @NCPspeaks @PawarSpeaks
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) September 15, 2020
या भेटीवेळी मराठा आरक्षणाला मिळालेली स्थगिती, त्यातील न्यायालयीन बाबी, सर्व घडामोडी व याविषयातील सर्व मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे खा. सुजय विखे पाटील यांनी समजमध्यामावर स्पष्ट केले.यावेळी या सर्वांनी मराठा आरक्षणातील लढ्यासाठी आम्ही खंबीरपणे आपल्या सोबत आहोत, अशी ग्वाही खासदार खा. संभाजीराजे यांनी दिली.तसेच चर्चेदरम्यान खासदार संभाजीराजे महाराजांना आपण स्वतः पुढाकार घेऊन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याविषयी अवगत करावे. तसेच याबाबतीत लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी चर्चा करावी, अशी विनंती खासदार संभाजीराजे यांना केली.