आपला सर्वात मोठा सण दिवाळी; चला तर मग जाणून घेऊ दिवाळीतील तिथी, वार आणि मुहूर्त वेळा!

Spread the love

महाराष्ट्रवरती कोरोनाचं सावट असताना दिवाळीवरही राहणार आहे. साधारणपणे वसुबारसपासून ते यमद्वितीय म्हणजेच भाऊबीजपर्यंत दीपोत्सव साजरा केला जातो. मात्र, यंदा अमावास्या तिथी दोन दिवस असल्यामुळे लक्ष्मीपूजन केव्हा करण्यात यावे, याबाबत संभ्रमावस्था निर्माण झालेली दिसून येत आहे. शास्त्रांनुसार, अश्विन अमावास्येला लक्ष्मी देवीच्या पूजनासह गणपती आणि कुबेराची पूजा करावी, असे सांगितले जाते. वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा आणि भाऊबीज नेमके कधी आहेत? ते कोणत्या दिवशी साजरे केले जातील? पाहूया…
एक-दोन नव्हे, तर 5 दिवसांचा हा हिंदूंचा दिवाळी हा सण. अनेक ठिकाणी घराघरांमध्ये दिवाळीच्या निमित्ताने तयारीला सुरुवात देखील झाली असेल. परंतु, कोरोनामुळे दिवाळीसारखा धामधुमीचा सण देखील अगदी साधेपणाने साजरा करायचा आहे. आता सुरक्षित दिवाळी साजरी करूया.
आपल्या आपल्यासाठी महामेट्रो न्यूज घेऊन आली आहे दिवाळीतील सणांची तारीख आणि मुहूर्त, नक्की जाणून घेऊयात.

पहिला दिवा, वसूबारस :-
कार्तिक कृष्ण द्वादशीचा दिवस गोमातेची आणि वासराची पूजा करून साजरा केला जातो. यंदा वसूबारस ११ नोव्हेंबर (गुरुवारी) ला आहे. रात्री १२ वाजून ४० मिनिटांनी द्वादशी सुरू होऊन दुसऱ्या दिवशी ९ वाजून ३० मिनिटांपर्यंत असणार आहे. पूजा करण्याचा मुहूर्त सायंकाळी ५.२९ ते रात्री ८. ७ मिनिटांपर्यंत असणार आहे.
दुसरा दिवा, धनत्रयोदशी :-
यंदा हा सण 13 नोव्हेंबरला (शुक्रवारी) आहे. धन्वंतरीची पुजा करण्याचा दिवस म्हणजे धनत्रयोदशी. या दिवशी अपमृत्यू टाळण्याची पूजा करण्यासाठी यमदीपदान करण्याची प्रथा आहे. ९ वाजून ३० मिनिटांनी त्रयोदशीची तिथी सुरू होणार आहे. दुसऱ्या दिवशी ती ५. ५९ मिनिटांपर्यंत असणार आहे. सायंकाळी ५. २८ मिनिटांनी सुरू होऊन ५. ५९ मिनिटांपर्यंत पूजाचा मुहूर्त आहे.
तिसरा दिवा, नरक चतुर्दशी :-
दिवाळीची खरी सुरूवात म्हणजे अभ्यंगस्नान करून, कारिंटे फोडून प्रतिकात्मक नरकासुराचा वध करून सण साजरा करण्याचा म्हणजेच नरक चतुर्दशी. यंदा नरक चतुर्दशी १३ नोव्हेंबरला संध्याकाळी ५ वाजून ५९ मिनिटांनी चतुर्दशी तिथी सुरू होणार असून दुसऱ्या दिवशी दुपारी २. १७ मिनिटांपर्यंत असणार आहे. अनेकनदा चतुर्दशी आणि अमावस्या तिथी एकत्र येते. या वर्षी दोन्ही तिथी एकत्र आल्या आहेत.
चौथा दिव, लक्ष्मीपूजन :-
दिवाळीत संध्याकाळी दिवेलागणीची वेळ म्हणजे लक्ष्मीपूजनाचा काळ. या दिवशी लक्ष्मीपूजन केले जाते. यावर्षी 14 नोव्हेंबर आणि १५ नोव्हेंबरला लक्ष्मीपूजन असणार आहे. 14 नोव्हेंबरला दुपारी २ नंतर सुरू होऊन १५ नोव्हेंबर ला १० वाजून ३६ मिनिटांपर्यंत मुहूर्त आहे. या दिवशी शनी अमावस्या असल्याने शनीची पूजा करणे देखील लाभदायक ठरणार आहे.
पाचवा दिवा, बलिप्रतिपदा/पाडवा\गोवर्धन पूजा :-
कार्तिक शुद्ध प्रतिपदा – सोमवार, १६ नोव्हेंबर २०२० पहाटे १:५० ते ३:३०, पहाटे ५:३० ते ८:००, सकाळी ९:३० ते ११:००. कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून साजरा केला जातो.साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. या दिवशी बळीराजाच्या प्रतिमेचे पूजन करावी. जमिनीवर पंचरंगी रांगोळीने बली आणि त्याची पत्नी विंध्यावली यांची चित्रे काढून त्यांची पूजा करावी. या दिवशी पक्वान्नांचे भोजन करावे. बळीला नैवेद्य दाखवावा. यथाशक्ती ब्राह्मण भोजन घालावे. बलीप्रीत्यर्थ दीप अन् वस्त्रे यांचे दान करावे. या दिवशी प्रातःकाळी अभ्यंगस्नान केल्यावर स्त्रिया पतीला ओवाळावे. व्यापाऱ्यांसाठी आर्थिक हिशेबाच्या दृष्टीने नववर्षाची सुरुवात मानली जाते. व्यापरी या दिवशी नव्या वह्यांचे पूजन केलं जातं. जमा-खर्चाच्या नवीन वह्या या दिवशी सुरू केल्या जातात. या दिवशी गोवर्धन पूजा करण्याची देखील प्रथा आहे. त्यासाठी शेणाचा पर्वत करून त्यावर दूर्वा आणि फुले खोचावे.
सहावा दिवा, भाऊबीज :-
या दिवशी बहीण-भावाच्या नात्याला जपण्यासाठी, वृद्धिंगत करण्यासाठी प्रार्थना केली जाते. भाऊबीजेचा शुभमुहूर्त दुपारी १ वाजून १० मिनिटांनी सुरू होऊन दुपारी ३. १८ मिनिटांपर्यंत असणार आहे. भाऊबीजेला यम द्वितीय असे देखील म्हटले जाते. या दिवशी यमाची बहीण यमी हिने आपल्या भावाकडे समस्त भावाचे प्राणाचे दान मागितले होते. ते यमाने दिले. 16 नोव्हेंबरला दिवाळी सणाची धामधूम भाऊबीजेच्या सणाने संपणार आहे.

दिवाळीची पौराणिक कथा

हिंदू धर्मात प्रत्येक सणाने बऱ्याच धार्मिक मान्यता आणि कथा जोडलेल्या आहेत. दिवाळीला घेऊन ही दोन पौराणिक कथा प्रचलित आहे.

1.  कार्तिक अमावास्येच्या दिवशी भगवान श्री राम चौदा वर्षानंतर वनवास करून आणि लंकापती रावण याचा नाश करून अयोध्या आले होते. या दिवशी भगवान राम यांच्या अयोध्येत आगमनाच्या आनंदाने लोकांनी दिवे लावून उत्सव साजरा केला होता. तेव्हा पासून दिवाळीची सुरवात झाली.
2.  एक अन्य कथेच्या अनुसार नरकासुर नावाच्या राक्षसाने आपल्या असुर शक्तींनी देवता आणि साधू संतांना खूप त्रास आणि चिंतीत केले होते. या राक्षसाने साधू संतांच्या सोळा हजार स्त्रियांना बंदी बनवले होते. नरकासुरच्या वाढत्या अत्याचाराने चिंतीत देवी देवता आणि साधू संत यांनी भगवान श्री कृष्णाकडे मदत मागितली यानंतर भगवान श्री कृष्णाने कार्तिक महिन्यात कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला नरकासुराचा वध करून देवता आणि संतांना त्याच्या आतंकाने मुक्ती दिली. सोबतच सोळा हजार स्त्रियांना मुक्त केले. याच्या आनंदात दुसऱ्या दिवशी म्हणजे कार्तिक महिन्याच्या अमावास्येला लोकांनी आपल्या घरात दिवे लावले. तेव्हा पासून नरक चतुर्दशी आणि दीपावलीचा सण साजरा केला जातो.

याच्या व्यतिरिक्त दिवाळीला घेऊन अधिक पौराणिक कथा ऐकायला मिळतात.

1.  धार्मिक मान्यता आहे की, ह्या दिवशी भगवान विष्णूने राजा बळीला पातळ लोकांचा स्वामी बनवले होते आणि इंद्राने स्वर्गाला सुरक्षित पाहून आनंदात दिवाळी साजरी केली होती.
2.  याच काळात समुद्र मंथनाच्या काळात क्षिरसागराने लक्ष्मी प्रगट झाली होती आणि त्यांनी भगवान विष्णूला पतीच्या स्वरूपात स्वीकार केले होते.

  • आपणांस आणि आपल्या परिवारास महामेट्रो न्यूज आणि इंडिया न्यूज 14 परिवाराकडून दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा..
    💐💐💐💐💐💐💐
Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.