इंदापूर तालुक्यातील जलसंपदा विभागांच्या कामांसंदर्भात राज्यमंत्री दत्तात्रय भरणेंचा पुढाकार!

Spread the love

मुंबई | आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.अजित दादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली जलसंपदामंत्री मा.जयंत पाटीलसाहेब व खासदार सौ.सुप्रिया ताई सुळे यांच्या उपस्थितीमध्ये इंदापूर तालुक्यातील जलसंपदा विभागांच्या कामांसंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी इंदापूर तालूक्यातील सर्व जिल्हा परिषद सदस्य तसेच पदाधिकारी यांनी VC द्वारे संवाद साधला.

आढावा बैठकीत झालेल्या चर्चेनुसार खालीलप्रमाणे निर्देश देण्यात आले आहेत

1. उजनी जलाशयातून उपसा सिंचन योजनेद्वारे शेटफळगढे येथील खडकवासला कालव्यामध्ये टाकून इंदापूर तालुक्यातील लाभ क्षेत्रासाठी खडकवासला कालव्याद्वारे पाणी कमी पडत असल्याने उजनी बॅकवॉटर क्षेत्रांमध्ये बॅरेजेस उभारण्यासाठी तात्काळ सर्वे तसेच या उपसासिंचन योजनेचा तात्काळ सर्वे करून तसा अहवाल शासनाकडे सादर करण्याचे आदेश देण्यात आले.
2. खडकवासला कालवा व सर्व वितरकांचे दुरुस्ती करण्याचे आदेश देण्यात आले.
3. निरा डावा मूळ कालवा पूर्णपणे नव्याने वाढीव वहन क्षमतेचा करण्याचा सर्वे करून कालवा अस्तरीकरण व काँक्रिटीकरण करण्याचे अंदाजपत्रक तात्काळ शासनाकडे मंजुरीसाठी सादर करावे.
4. शेटफळ हवेली तलावाची राहिलेली अपुर्ण उंची वाढवण्याचे काम व सांडवा वितरीकेचे अपूर्ण काम करण्याचे आदेश देण्यात आले.
5. नीरा नदीवरील जांब, खोरोची, चिखली, वालचंदनगर, कुरवली, निर निमगाव,पीठेवाडी व बोराटवाडी येथील केटीवेअर बंधारे व भिमा नदीवरील भाट निमगाव, टण्णू, नरसिंगपूर येथील केटीवेअर बंधारे दुरूस्त करण्यासाठी व कॉक्रीटीकरण करण्याचे कामाचे अंदाजपत्रके तात्काळ कृष्णा खोरे विकास मंडळाकडे सादर करून आवश्यक निधी मंजूर करण्यात यावा असे निर्देश देण्यात आले.
6. निरा नदीवरील उद्धट व सोमथळी या धर्तीवर खोरोची बेटात नव्याने बॅरेजेस बांधकाम करणेसाठी तात्काळ सर्वे करून अहवाल महामंडळाकडे सादर करण्याचे निर्देश दिले.
7. लाकडी-निंबोडी उपसा सिंचन योजनेचे 5600 हेक्टर क्षेत्रासाठी तात्काळ सर्वे करण्याचे आदेश देणेत आले.
8. टाटा कंपनीच्या ताब्यात असणाऱ्या मुळशी धरणातून 10 टीएमसी पाणी पुणे शहरासाठी वाढीव लोकसंख्या लक्षात घेता नियोजन करण्याचे प्रस्तावित आहे. याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.

महाविकास आघाडीच्या सरकार मध्ये काम करताना राज्यासह तालुकाच्या विकासासाठी मी सर्वोतोपरी प्रयत्नशील असेल. तालुक्याचा सर्वात जिव्हाळ्याचा विषय मार्गी लावण्यासाठी मी कटिबद्ध आहे.

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.