Spread the love

मुंबई | मध्य रेल्वे मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाचा विमानतळाच्या धर्तींवर पुनर्विकास करण्यात येणार आहे. सीएसएमटीला जागतिक दर्जाचे मल्टिमॉडेल हब बनवण्याचा प्रस्ताव भारतीय रेल्वे स्थानक विकास महामंडळाने (आयआरएसडीसी) तयार केला असून हे सीएसएमटी रेल्वे स्थानकांचे पुनर्विकासाचे काम सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर करण्यात येणार आहे. मध्य रेल्वेचे मुख्यालय असलेली ही वास्तू युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट आहे. गॉथिक शैलीतील ही इमारत जगभरातील पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. 2008 पासून सीएसएमटी रेल्वे स्थानकाचे पुनर्विकासाचे काम हाती घेतले आहे. मात्र, जागतिक वारसा लाभलेल्या या स्थानक व परिसराचे काम करण्यासाठी अनेक अडचणी होत्या. त्यामुळे त्याची मंजुरी आणि अन्य प्रक्रियांमध्ये बराच कालावधी गेला आहे. मात्र, आता या प्रकल्पाला गती मिळणार आहे.

आयआरएसडीसीने  पीपीपी मॉडेलद्वारे या स्टेशनच्या  पुनर्विकासासाठी तत्वता मंजुरी दिली आहे. 20 ऑगस्टला या संदर्भात निवीदा प्रकाशित करण्यात आल्या असून. निवीदांची छाननी 22 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. स्टेशनच्या हेरीटेज दर्जाला हात न लावता हे स्टेशन पुर्नविकास करण्यात येणार आहे.

स्टेशनचा चेहरा मोहरा बदलणार…
सीएसएमटी येथे मेल-एक्स्प्रेस आणि लोकल यांच्यासाठी स्वतंत्र टर्मिनस आहे. तेथे प्रवाशांना वावरण्यासाठी मोकळी जागा निर्माण करण्यात येणार आहे. तसेच सीएसएमटी स्थानकाला लागूनच असलेल्या अ‍ॅनेक्स इमारतीसमोरील टॅक्सी स्टॅण्ड हटविण्यात येणार आहे. येणार्‍या प्रवाशांसाठी मोकळी जागा व बसण्यासाठी आसन व्यवस्था केली जाईल. तसेच ऐतिहासिक सीएसएमटी इमारत पाहण्यासाठी हॅरिटेज गॅलरी उभारण्यात येणार आहे. मशीद बंदर स्थानकाच्या दिशेला लोकल आणि लांब पल्ल्याच्या मार्गिकांच्या यार्डचे नूतनीकरण करण्यात येईल.

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.