येत्या 4 दिवसांत खडसे राष्ट्रवादीत; पवारांकडून मंत्रिपदाची मिळणार भेट?

Spread the love

मुंबई | मागील काही दिवसांपासून पक्ष नेतृत्वावर नाराज असलेले जळगाव जिल्ह्यातील भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे एकनाथ खडसेराष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. काल बुधवारपासून एकनाथ खडसे हे मुबंईत ठाण मांडून असल्याने त्यांच्या पक्षांतराच्या चर्चेने अधिक जोर धरला आहे. एकनाथ खडसे यांनी गुरुवारी मुंबईत झालेल्या भाजप कार्यकारिणीच्या बैठकीला प्रत्यक्षात पक्ष कार्यालयात न जाता व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून हजेरी लावली. त्यामुळे त्यांच्या पक्षांतरणाच्या चर्चेला आणखीनच बळ मिळाले आहे.

खडसे मुंबईत तहान मांडून बसले असल्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती खडसे समर्थकांनी दिली आहे. मात्र, एकनाथ खडसे यांनीनियमित आरोग्य तपासणीसाठी मुंबईत आल्याचे सांगत शरद पवार यांची भेट घेण्याचा वृत्ताचा स्पष्ट शब्दात इन्कार केला होता. दुसरीकडे शरद पवार यांनीही अशी कोणतीही भेट ठरलेली नसल्याचे सांगितले होते..

दरम्यान, गुरुवारी मुंबईत भाजपाच्या नवनियुक्त राज्य कार्यकारणीची बैठक होती. त्याला खडसे उपस्थित राहणार का, याची सर्वांना उत्सुकता होती. खडसे पक्ष कार्यालयात प्रत्यक्षात उपस्थित राहिले नाहीत. व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून त्यांनी बैठकीला उपस्थिती लावली. एकीकडे खडसे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून भाजप राज्य कार्यकारणीच्या बैठकीत उपस्थित लावली असली तरी जळगाव जिल्ह्यात मात्र त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाची चर्चा कायम आहे. येत्या 4 दिवसांत खडसे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार असल्याचे संकेत त्यांच्या समर्थकांकडून मिळाले आहेत. शरद पवार खडसे यांना मंत्रिपद देणार असल्याचेही खडसे यांचे जळगावातील समर्थक छातीठोकपणे सांगू लागले आहेत.

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.