मोदी सरकारची मोठी घोषणा, आजपासून मोफत लसीकरण मोहिमेची सुरुवात!

Spread the love

नवी दिल्ली | आंतरराष्ट्रीय योग दिवसापासून 21 जून देशात 18 वर्षावरील प्रत्येक नागरिकाचं मोफत कोरोना लसीकरण करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना मोफत लसीकरणााची घोषणा केली. त्यांनी आपल्या घोषणेत म्हटलं होतं की, 21 जूनपासून सरकार 18 वर्षांवरील प्रत्येक नागरिकाचं विनामूल्य लसीकरण करेल. आजपासून जगातील सर्वात मोठ्या मोफत लसीकरण मोहिमेची सुरुवात होत आहे.

नवीन मोफत लसीकरण धोरण काय आहे ते जाणून घ्या

नवीन लसीकरण मोहिमेत 18 ते 44 वयोगटातील नागरिक थेट लसीकरण केंद्रात जाऊन लस घेऊ शकतात. यापूर्वी ही लस घेण्यासाठी 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना CoWIN पोर्टलद्वारे अपॉईंटमेंट घेणे आवश्यक होते. मात्र या मोहिमेनुसार, 18 वर्षे वयोगटातील सर्व नागरिकांना केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून मोफत लस दिली जाईल. या मोठ्या लसीकरण मोहिमेचा संपूर्ण खर्च केंद्र सरकार उचलेल आणि राज्यांना काही पैसे खर्च करावे लागणार नाहीत. दरम्यान खासगी रुग्णालयात लस मिळण्यासाठी किंमत मोजावी लागेल.

मुंबई पालिका सज्ज

कोरोनाची साथ नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरणाच्या मोहिमेची व्याप्ती आजपासून अधिक वाढणार आहे. या लसीकरण मोहिमेसाठी मुंबई पालिका सज्ज झाली आहे. पालिकेनं नियोजन केलं आहे. लसीकरणासाठी नोंदणी तसेच इतर अडचणी येऊ नयेत, म्हणूनही विशेष लक्ष दिले जात आहे. त्यासाठीच, पहिल्या टप्प्यात 30 ते 44 वर्षे वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण केले जाईल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने 18 ते 29 वर्षांपर्यंतच्या व्यक्तींना लस दिली जाणार आहे. पालिकेनं आठवड्यातील तीन दिवस हे थेट लसीकरणासाठी राखीव ठेवले असून आठवड्यातील सोमवार, मंगळवार, बुधवार या तीन दिवशी कोणतीही नोंदणी न करता नागरिकांना थेट लस घेता येणार आहे. तर गुरुवार ते शनिवार हे तीन दिवस मात्र नोंदणी करूनच लस दिली जाईल.

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.