महावितरणचा भोंगळ कारभार; लोकांनी लाईटबिल पाहून आत्महत्या केल्या तर याला जबाबदार कोण?

Spread the love

पुणे | 3 महिने घर बंद असून देखील 11 हजार रुपये वीजबिल.. ऑनलाइन वीजबिल भरून देखील पुढील बिलात त्यांची वजावट केलेली नाही या व अशा असंख्य ग्राहकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे “तक्रारी काही कमी होईना आणि महावितरणच्या वीजबिल भरणा केंद्रापुढील रांगा काही थांबेना’ अशी परिस्थिती सध्या शहरात पहावयास मिळत आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने 23 मार्चला रात्री
12 वाजेपासून राज्यात लॉकडाऊन लागू केला. त्यामुळे महावितरणकडूनदेखील मीटर रीडिंग पूर्णपणे बंद ठेवण्यात आले. त्यानंतर चार वेळा लॉकडाऊनची मुदत राज्य सरकारकडून वाढविण्यात आली. दरम्यान लॉकडाऊनच्या कालावधी रीडिंग घेणे शक्य न झाल्यामुळे महावितरणने त्या काळातील सरासरी वीजबिल पाठविण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी मागील वर्षी या महिन्यात वापर झालेले युनिट ग्राह्य धरण्यात आले. दरम्यान लॉकडाऊनच्या कालावधीत महाराष्ट्र वीजनियामक आयोगाने एक एप्रिलपासून राज्यातील वीजदरात वाढ करण्यास मान्यता दिली. त्यामुळे मार्च महिन्यातील युनिटसाठी एक दर, तर एप्रिलपासून वाढीव दर अशामुळे नागरिकांना प्रचंड वीजबिले आली. त्यामुळे ग्राहकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

ग्राहकांच्या तक्रारी विचारात घेऊन महावितरणने 18 जून नंतर तक्रारींचे निवारण करण्यासाठी केंद्र सुरू केली. परंतु त्यास देखील आता दीड महिना होऊन गेला. अद्यापही वीजबिलाबाबत तक्रारी असलेल्या नागरिकांच्या रांगा वीजबिल भरणा केंद्राबाहेर ग्राहकांच्या रांगा असल्याचे चित्र पाहवास मिळत आहे. तर अनेक ठिकाणी केंद्र ही अद्यापही बंदच आहेत. त्यामुळे देखील ग्राहकांना मनस्ताप सहन कराव लागत आहे.

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.