लोकशाही आहे, राजेशाही असती तर दाखवलंच असतं : उदयनराजे कडाडले!

Spread the love

सातारा | आरक्षणावर शरद पवार का गप्प आहेत त्याचे उत्तर तेच देऊ शकतील. मी जे तळमळीनं बोलतोय, मुलभूत प्रश्न समजून घेत नसाल, त्यावर पर्याय काढत नाही, मी सांगकाम्या नाही, कोणीही उठावं आणि सांगावं. कोर्टाचा अवमान करत नाही, पण कोर्ट म्हणजे कोण हो, असा सवाल करीत ती माणसचं आहेत त्यांनी विचार करायला हवा आहे, असे उदयनराजे म्हणाले. सर्व समाजांबद्दल मला आदर आहे, प्रत्येकाला त्याचा हक्क मिळाला पाहिजे, न्यायालयानेही सर्व लोकांना समान अधिकार द्यावेत, न्याय मिळाला नाही तर उद्रेक होणं स्वाभाविक आहे. मराठा आरक्षणावर सरकारने काही केलं तर ठीक, नाहीतर राजकारणाला रामराम करणार, राजीनामा देऊन टाकणार, हे मी मनापासून सांगतोय असं खासदार उदयनराजे भोसले यांनी स्पष्ट केले आहे.

आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांची येथील जलमंदिर पॅलेस येथे वृत्तवाहिन्यांनी मुलाखत घेतली. त्यावेळी उदयनराजेंनी विविध प्रश्‍नांवर रोखठोक उत्तरे दिली. ते म्हणाले, मी कधीही राजकारण केले नाही. केवळ मराठा समाज नाही तर कोणत्याही समाजावार अन्याय होत असेल तर त्यांच्यासाठीही लढणार, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राजीनामा द्यावा लागला तरी राजीनामा देईन, पदावरुन राहून आपण काय करु शकत नसलो तर त्याचा उपयोग काय? वेळ आली तर राजीनामा देईन, असे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, या मुलाखतीत त्यांनी पोलीस भरतीवर भाष्य करणार नसल्याचे स्पष्ट केले. त्याचसोबतच सध्या लोकशाही आहे, राजेशाही असती तर दाखवलं असतं. अन्याय होत असेल तर लोकशाहीच्या राजांनी राजासारखं वागावं इतकचं माझं म्हणणं आहे. लोकांनी निवडून द्यायचं मग त्याच भान ठेवायला हवं, प्रत्येकाला न्याय देण्याची भावना असली पाहिजे. अन्यथा राजेशाही आणा, मग दाखवतो, काय करायचं अन्‌ काय नाही असेही उदयनराजेंनी ठणकावून सांगितले. मराठा समाज आज प्रश्न विचारतायेत, आरक्षणावर अन्याय का? उद्या काय करतील मला सांगता येत नाही, राजकीय पक्षांबद्दल संताप व्यक्त होत आहे., मी जे तळमळीनं बोलतोय, मुलभूत प्रश्न समजून घेत नसाल, त्यावर पर्याय काढत नाही, असेही उदयनराजे म्हणाले.

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.