ब्रेकिंग: ग्रामपंचायत रणधुमाळी नंतर इंदापूर तालुक्यातील सरपंचपदाचे आरक्षण जाहिर!
इंदापूर | आज झालेल्या सरपंच आरक्षण सोडतीमध्ये इंदापूर तालुक्यातील काही गावांचे आरक्षण बदली झाले, मात्र औरंगाबाद खंडपीठातील निर्णयानुसार राज्य सरकारने अनुसूचित जाती व जमातीशी संबंधित आठ डिसेंबर रोजी काढण्यात आलेल्या आरक्षणाची सोडत कायम ठेवली. त्यांच्या आरक्षणात कोठेही बदल केला नाही. सोनाक्षी योगेश साळवी (वय 12) या मुलीच्या हस्ते चिठ्या काढण्यात आल्या.
खुल्या प्रवर्गातील सरपंच व गावांची नावे:-
सणसर, शेटफळगडे, तावशी, वडापुरी, चिखली, काटी, निमसाखर, टणू, अकोले, कुरवली, कुंभारगाव, हगारेवाडी, सुरवड, अगोती नंबर १, जाचकवस्ती, पिंपळे, शहा, पिंपरी खुर्द, गोतोंडी, लोणी देवकर, जाधववाडी, कचरवाडी- (निमगाव केतकी) तरंगवाडी, झगडेवाडी, वालचंदनगर, शेटफळ हवेली, वरकुटे खुर्द, तक्रारवाडी, भादलवाडी,
भावडी, घोरपडवाडी.
खुल्या गटातील महिला सरपंच व गावांची नावे:-
पवारवाडी, गलांडवाडी नंबर 2, कांदलगाव, डाळज नंबर 1, बिजवडी, पिंपरी बुद्रुक, कळाशी, भोडणी, बाभूळगाव, डाळज नंबर 2, शेळगाव, निरवांगी, कालठण नंबर एक, बेलवाडी, न्हावी, निंबोडी, निर निमगाव, काझड, गांजेवळण, सराफवाडी, लुमेवाडी, बळपुडी, शिरसटवाडी, दगडवाडी, पंधारवाडी,थोरातवाडी, गिरवी, आजोती, रेडा, माळवाडी, कळस.
इंदापूर तालुक्यात आगामी पाच वर्षात या गावांमध्ये:-
होणार नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिला सरपंच रेडणी, लाखेवाडी, भरणेवाडी, मदनवाडी, कचरवाडी बावडा, सराटी, वकीलवस्ती, भांडगाव, अगोती नंबर 2, बोरी, बोराटवाडी, बावडा, कौठळी,रुई,अवसरी, गोंदी ओझरे.
इंदापूर तालुक्यात आगामी पाच वर्षात नागरिकांच्या इतर
मागास प्रवर्गातील सर्वसाधारण सरपंच होणार:-
आनंदनगर, गोखळी, म्हसोबाची वाडी, चाकाटी, पिठेवाडी, खोरोची, व्याहाळी, लासुर्णे, मानकरवाडी, पडस्थळ, सरडेवाडी, भिगवण, डाळज नंबर 3, पळसदेव, निमगाव केतकी.