26 जानेवारीच्या मुहूर्तावर शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट च्या पुणे व पिंपरी चिंचवड शहर पदाधिकाऱ्यांची नेमणूक !

Spread the love

पुणे | महाराष्ट्रामध्ये शून्यातून रक्तदानाची चळवळ उभी करून रुग्णांना मोफत रक्ताची बॅग उपलब्ध करून देण्यासाठी दिवस रात्र झटणाऱ्या शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थेची आज 26 जानेवारीच्या मुहूर्तावर शिवशंभू ट्रस्ट चे महाराष्ट्र राज्याचे संस्थापक/अध्यक्ष शिवश्री भूषण सुर्वे महाराष्ट्र राज्याचे संपर्क प्रमुख अप्पासाहेब घोरपडे यांच्या हस्ते नियुक्ती पत्रक देऊन पुणे शहरामध्ये पदनियुक्ती करण्यात आली.

गावाकडून येणाऱ्या रुग्णांना पुण्यामध्ये रक्ताच्या अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता हे लक्षात घेऊन पुणे शहर पिंपरी चिंचवड शहराची पदनियुक्ती करण्यात आली, असे शिवश्री भूषण सुर्वे यांनी यावेळी सांगितले यापुढे पुण्यामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करून प्रत्येकाला मोफत बॅग उपलब्द करून देण्याची संकल्पना असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

पुणे शहर पदाधिकारी पुढीलप्रमाणे:-

पुणे शहर महिला अध्यक्ष – सोनालीताई जाधव, पुणे शहर प्रमुखरोहित डोळस, पुणे शहर संपर्क प्रमुखशेखर पवार, पुणे शहर कार्याध्यक्षराहुल भोसले, पुणे शहर संघटकविशाल पवार

पिंपरी चिंचवड पदाधिकारी पुढीलप्रमाणे:-

पिंपरी चिंचवड संपर्क प्रमुखपरशुराम लोखंडे, पिंपरी चिंचवड शहर प्रमुखकुमार सकट, पिंपरी चिंचवड कार्याध्यक्षसुहास नेटके

यापुढे जोमाने काम करून सामाजिक कार्यात शिवशंभू ट्रस्ट सोबत रक्तदानाची चळवळ आम्ही हि मोठ्या प्रमाणात करू असेही नवनिर्वाचितपदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published.

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.