ब्रेकिंग न्यूज; अखेर पुणे जिल्ह्यातील काही गावे स्वयंपूर्तीने बंद; निमगाव केतकीचाही समावेश!

Spread the love

पुणे | कोरोनाच्या रुग्णांची संख्या पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणच्या ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने गावांमध्ये बंद पाळण्यास सुरवात केली आहे. शिरूर तालुक्यातील कोरेगाव-भीमा आंबेगाव तालुक्यातील मंचर शहर व इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी या गावांमध्ये ग्रामस्थांच्यावतीने स्वयंपूतिने 5 दिवस गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

निमगाव केतकीत पाच दिवस बंद …

इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथील कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता शनिवारी ग्रामस्थांनी घेतलेल्या बैठकीत मंगळवार ते शनिवार (ता. 8 ते 12) असे पाच दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. येथील ग्रामीण रुग्णालयात सुरू केलेल्या कोविड सेंटरमध्ये मरण पावलेल्या व्यक्तींचा अंत्यविधी त्या व्यक्तीच्या गावातच व्हावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. ग्रामीण रुग्णालयात कोविड सेंटर सुरू केल्याने येथील ओपीडी बंद केली आहे. त्यामुळे इतर रुग्णांचे हाल होत असल्याने ओपीडी पुन्हा सुरू करण्याची मागणीही करण्यात आली. 

महसूल प्रशासनाच्या आदेशानुसार या कालावधीत गावातील औद्योगिक आस्थापना, वैद्यकीय आस्थापना (दवाखाने, मेडिकल) व शासकीय कार्यालये सोडून सर्व प्रकारच्या आस्थापना पूर्णपणे बंद राहतील. भाजीपाला विक्री पूर्णपणे बंद, दूध विक्री सकाळी 7 ते 11 व सायंकाळी 5 ते 7 दरम्यान सुरू ठेवावी अन्यथा कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. गावातील बॅंका चालू राहतील, मात्र सोशल डिस्टन्सिंगचे पालन न केल्यास शाखाव्यवस्थापकावरही आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला जाईल. अत्यावश्‍यक कामाशिवाय बाहेर पडू नये. विनामास्क घराबाहेर आढळल्यास 200 रुपये दंड केला जाईल. प्रतिबंधात्मक क्षेत्रात वाहन वापरावरही पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.