शिवसेना वैद्यकीय कक्ष इंदापूर तालुक्यासाठी CM शिंदे साहेब आणि मंगेश चिवटेंच्या माध्यमातुन ambulance भेट!
कितेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सोशल मिडिया प्रमुख भूषण सुर्वे आणि विशाल धुमाळ यांच्या सामाजिक कार्यातील प्रयत्नाना यश.
इंदापूर । शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातुन समाजातील प्रतेक गरजू रुग्णाला मदत मिळवून देण्यासाठी वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या माध्यमातून मा. बाळासाहेब ठाकरे साहेब, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या प्रेरणेतून आणि संवेदनशील मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब, खा. डॉ. श्रीकांत शिंदे साहेब, मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे विशेष कार्यअधिकारी तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे OSD, आमचे गुरुवर्य मंगेशजी चिवटे सर कक्ष प्रमुख मा. रामहरी राऊत, सह कक्ष प्रमुख माउली घुळगंडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पुणे जिल्हा ग्रामीण भाग (इंदापूर-बारामती-भिगवण-दौंड) महाराष्ट्र राज्य सोशल मिडिया प्रमुख शिवश्री भूषण सुर्वे, पुणे उपजिल्हा वैद्यकीय समन्वयक विशाल धुमाळ यांच्या नेतृत्त्वाखाली पुणे जिल्ह्यात प्रामाणिकपणे मोठे काम चालू असताना मंगेश चिवटे यांनी ambulance देउन इंदापूर तालुक्यातील जनतेला वैद्यकीयचा पाया भक्कम करुन दिला आहे.
काल ३१ तारखेला स्वतःहा महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री मा एकनाथ शिंदे साहेब, खा. डॉ श्रीकांत शिंदे साहेब, नरेशजी म्हस्के साहेब आणि मुख्यमंत्री सहायत्ता कक्षाचे कक्ष प्रमुख मा मंगेशजी चिवटे साहेब यांनी मुंबई येथील टेंभी नाका येते मध्यरात्री रक्तदान शिबिराच्या ठिकाणी या ambulance चे अनावरण करुन गाडीची चावी शिवश्री भूषण सुर्वे, विशाल धुमाळ, डॉ जीवन सगरे यांच्याकडे सुपुर्त केली. यावेळी कक्ष प्रमुख राम राऊत सर, नाशिकचे डॉ प्रथमेश पाटिल, राजाभाऊ भिलारे, राहुल ढवळे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
पुणे-सोलापूर हायवेवरील अपघात पहाता शिवश्री भूषण सुर्वे, विशाल धुमाळ यांनी रुग्णांसाठी छोटीशी ambulance गाडीची विनंती केली असता मंगेश चिवटे यांना एका क्षणाचाही विलंब न लावता करमाळा येथे देण्यात येणारी गाडी ही इंदापूर तालुक्यात जनतेला फायदा व्हावा म्हणून देवू केली. ही ambulance ना-नफा-ना-तोटा या तत्त्वावर देण्यात येणार असून इंदापूर-बारामती-भिगवण-पुणे-करमाळा-दौंड अनेक ग्रामीण भागात धावेल असे सुर्वे यांनी सांगितले. त्याचबरोबर cm फंडातून निधी कसा मिळावा कोणत्या योजना कोणासाठी लागू होतील याचीही माहिती रुग्णांपर्यंत पोहचविण्याचे काम इंदापूर तालुक्यातील सागर आवटे, आनंद केकान, सोमनाथ लांडगे वैद्यकीय समन्वयक सहायक सर्वच पदाधिकारी जोमाने करतील.