तब्बल 101 वर्षांच्या आजीसमोर कोरोना हतबल; आजी सुखरूप घरी परत!
इंदापुर | संपूर्ण जगाला कोरोनाया महामारीने वेधले असता पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यामधील डाळज नंबर 1 या गावातील 101 वर्षाच्या मंडोदरी हरिबा जगताप या आजीने 15 दिवसाच्या अथक प्रयत्नानंतर कोरोनावर मात करून घरी सुखरूप पोहोचले आहेत. भिगवण येथे नव्याने सुरू झालेल्या कोविड हॉस्पिटलमधील डॉक्टर गाढवे, डॉक्टर पवार व त्यांच्या सर्व स्थापना या आजीवर औषध उपचार करून आजीला सुखरूप घरी पोहोचले आहे, त्यामुळे आजीच्या घरातील आणि गावातील लोकांनी 101 वर्षाच्या आजीने कोरोना वर मात केल्यामुळे गावामध्ये जंगी स्वागत केले तसेच घरातील सर्व मुले सुना नातवंडे यांनी आजीला फुलाच्या पायघड्या घालून ओवाळून हार फुले देऊन सत्कार केला त्यामुळे आजीने आजच्या चाळीमध्ये आपले प्राण गमावणाऱ्या अनेक तरुणांना लाजविले असून इच्छाशक्तीच्या बळावर कोणत्याही वयातील व्यक्ती कसल्याही आघात आला घाबरत नसून सर्वांनी दयाने संकटांना सामोरे गेले पाहिजे हेय आजीने दाखवून दिले आहे.
आजीला सुखरूप कोरोना महामारीतून बरे करणाऱ्या डॉक्टर व त्यांच्या सर्व स्टाफ चे हार फुले देऊन आजीच्या कुटुंबातील लोकांनी सत्कार केला आजी ही कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक गजानन बापू जगताप यांच्या मातोश्री असून त्यांचे नातू महेश जगताप तसेच नितीन हनुमंत जगताप, संतोष जगताप या सर्वांनी आजीला बरे करणाऱ्या डॉक्टरांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली त्यांच्या घरातील एक दीपस्तंभ परत सुखरूप पाठवला अशी भावना व्यक्त केली.