इंदापुर-बारामती राज्यमार्गावर सार्वजनिक बांधकाम विभाग आणि आमदार, खासदार अजून किती मृत्यू पाहणार आहेत; नागरिक त्रस्त!

Spread the love

इंदापुर | बारामती-इंदापूर राज्यमहामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे-खडेच पडले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग खड्ड्यांकडे दुर्लक्ष
करीत असून, तातडीने खड्डे बुजवून रस्त्याची दुरुस्ती करावी यासाठी बारामती-इंदापूर राज्यमार्गावरील काटेवाडी येथे युवकांनी खड्यामध्ये
झाड लावून गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केले. तसेच इंदापुर पासून बारामती पर्यंत जाण्यासाठी नागरिकांच्या मनात मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण देखील निर्माण झाले आहे, अश्यातच जर मृत्यू झाला तर याला जबाबदार कोण असाही मोठा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

तोच प्रकार बीकेबीएन या बारामती निरा नरसिंहपूर रस्त्याचा आहे. इंदापूर तालुक्यात हा रस्ता एवढा खिळखिळा झाला आहे की, गाडीचा शेतातील रस्ताही त्यापुढे बरा दिसेल. डांबर बाजूला जाऊन त्यातील खडी उचकटलेलीही अनेक ठिकाणी पाहायला मिळत असून रस्त्यात खड्डे की खड्डयात रस्ते हेच समजत नाही. याही रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शासनाने निधी मंजूर केला आहे. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात मंजूरी व आर्थिक तरतूद आलेला हा रस्ता अजूनही जैसे थेच आहे. तालुक्यातील विद्यमान आमदार, मंत्री तसेच राजकीय पुढारी यांच्या महागाईच्या गाड्या असल्याने याना एकही खड्डा जाणवत नसल्याचे नागरिकांनी सांगितले, परंतु सामान्य माणसाचे काय असाही सवाल यावेळी नागरिकांनी केला. आणि यापुढे जर मृत्यू झाला तर याला जबाबदार कोण याचे ही उत्तर सार्वजनिक बांधकाम विभागाने द्यावे असेही यावेळी विचारण्यात आले.

बारामती ते इंदापूरचा राज्यमार्ग हा संत तुकाराम पालखी महामार्ग नावाने काही दिवसातच ओळखला जाणार आहे. पालखी महामार्गासाठी भूसंपादन ही सुरु आहे. मात्र या मार्गावर अनेक खड्डे पडले आहेत. यामध्ये चालू वर्षीच्या पावसाचीही भर पडली. इंदापूर व बारामती तालुक्यामध्ये चालू वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे दरवषीच्या खड्डामध्ये पेक्षा जास्त खड्डे पडले असून खड्डे चुकविताना वाहनचालकांची दमछाक होत आहे. काटेवाडी ते भवानीनगरचा या दरम्यान खड्डात रस्ता की,रस्त्यात खड़े अशी परस्थिती निर्माण झाली आहे. भवानीनगर ते इंदापूर दरम्यानच्या रस्त्याला अनेक ठिकाणी खड्डे पडले असून खड्यामुळे छोटे-मोठे अपघात होत असून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्यामुळे सणसर गावचे माजी उपसरपंच श्रीनिवास कदम, अभयसिंह निंबाळकर, इंदापूर खरेदी-विक्री संघाचे संचालक अमोल भोईटे, सचिन भाग्यवंत यांनी काटेवाडीमध्ये रस्त्याच्या मध्यभागीच्या खड्यात झाड लावून गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केले. अभयसिंह निंबाळकर, माजी उपसरपंच सणसर – इंदापूर – बारामती रस्त्याची दैन्यावस्था आहे. महाराष्ट्रातील प्रगत तालुक्याची ही अवस्था आहे. जर कामे व्हायची असतील, तर त्याला अजून कितीतरी वर्षे लागतील. मग दहा वर्षे येथील नागरिकांनी वाट पाहायची का? दहा वर्षानंतर कोट्यवधींचा रस्ता होईल, मात्र त्यासाठी या रस्त्यावरून आज जाणारे व्यवस्थित तरी राहीले पाहिजेत, ज्यांना हा रस्ता पाहता येईल. प्रशासनाचे अधिकारी अत्यंत निर्लज्ज आहेत. खड्डे बुजविण्यासाठी ते जो खर्च टाकतात, त्याचे ऑडिट नीट होत नाही, किंबहुना त्याचे पुरावे राहत नाहीत म्हणूनच त्यांची मग्रुरी वाढली आहे. मात्र लोकांच्या संयमाची परिक्षा सरकार पाहते आहे असेच वाटते.

तरुणाचा गेला जीव…
सोमवार अंथुर्णे गावच्या हद्दीमध्ये बारामती-इंदापूर राज्यमार्गावर दुचाकी चालविताना खड्डा चुकविण्याच्या नादात दुचाकी व चारचाकीच्या अपघातामध्ये तरुणाचा जीव गेला. या अपघाताची वालचंदनगर पोलिस ठाण्यामध्ये अद्यापही नोंद झाली नाही अशी माहिती समोर आली आहे.

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.