शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यातील वैष्णव अनपट यांना हॉस्पिटलच्या बिलातून १ लाख ६५ मदत; कक्षप्रमुख मंगेश चिवटे यांचे विशेष सहकार्य लाभले!

Spread the love

इंदापूर | इंदापूर तालुक्यातील वैष्णव राहुल अनपट यांच्या मेंदुला दुखापत झाली असल्यामुळे ते विश्वराज हाॅस्पिटल पुणे येथे उपचार घेत होते, त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असल्यामुळे त्यांनी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे भिगवणचे विशाल धुमाळ व पुणे उपजिल्हा समन्वयक भूषण सुर्वे आणि जिल्हा समन्वयक अॅड.कानिफ कानतोडे यांच्या मार्फत पुढील उपचारासाठी त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी मिळावा यासाठी अर्ज केला होता. सदरील अर्जाचा ॲड.कानिफ कानतोडे यांनी वेळेवेळी पाठपुरावा करून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून त्यांना २५ हजार रूपयांची आर्थिक मदत मिळवून दिली.

तसेच रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर राहीलेले बील भरण्याकरिता रूग्णांचे नातेवाईक यांच्याकडे पुरेसे पैसे नसल्यामुळे त्यांनी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाकडे बील कमी करण्यासंबधित मदत मागितली. यावेळी विशाल धुमाळ व भूषण सुर्वे यांनी ॲड.कानिफ कानतोडे यांच्याकडे विनंती केली असता त्यांनी कक्षप्रमुख मंगेश चिवटे सर यांच्या सुचनेनुसार व मार्गदर्शनाखाली शिवसेना नेते तथा नगरविकास मंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांचे बील कमी करण्यासंबधित शिफारस पत्र हाॅस्पिटल प्रशासनास दिले व संबधित डाॅक्टरांना तात्काळ फोन करून हाॅस्पिटलचे बील कमी करण्याची विनंती केली, तसेच हाॅस्पिटलने एकूण बिलातून १ लाख ४० हजार रूपये बील माफ केले.

वैष्णव अनपटच्या उपचारासाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व कक्षप्रमुख मंगेश चिवटे यांच्या विशेष सहकार्यामुळे वैष्णव अनपट यांना एकूण १ लाख ६५ हाजारांची उपचाराकरिता मदत मिळाली, मदत मिळाल्यानंतर रूग्णांचे नातेवाईक यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, युवासेनाप्रमुख तथा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे,शिवसेना नेते तथा नगरनिकास मंत्री एकनाथजी शिंदे, खासदार डाॅ.श्रीकांत शिंदे,कक्षप्रमुख मंगेश चिवटे,जिल्हा समन्वयक ॲड.कानिफ कानतोडे, उपजिल्हा समन्वयक भूषण सुर्वे व विशाल धुमाळ तसेच शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डाॅ.श्रीकांत शिंदे फाऊडेशनच्या सर्व टीमचे आभार मानले.

त्याचप्रमाणे इंदापूर तालुकयातील व पुणे जिल्ह्यातील रुग्णांना सरकारी योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष २४ तास सेवेसाठी उभा आहे त्यांनी ९६९६९६०३३१ या नंबर वरती संपर्क करावा असे आव्हान शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे उपजिल्हा समन्वयक भूषण सुर्वे यांनी केले आहे. https://www.shivsenamedicalhelpcell.org

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.