Unlock-4; केंद्र सरकारची उद्यापासून होणाऱ्या अनलॉक ची नियमावली जाहीर!
मुंबई | इयत्ता 9 ते 12 वी च्या विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या मार्गदर्शनासाठी इच्छेनुसार शाळेत जाण्यास परवानगी दिली जाईल. विद्यार्थ्यांना बाहेर पाठवावे की नाही यासाठी पालकांची समंती अनिवार्य असेल. अनलॉक 4 मध्ये मेट्रोचे लॉकडाउन संपुष्टात आले आहे. 169 दिवसांपासून बंद असणारी मेट्रो सेवा 7 सप्टेंबरपासून सुरु करण्यास गृहमंत्रालयाने हिरवा कंदिल दिलाय. मर्यादित प्रवाशांसह मेट्रो धावताना दिसेल. परिस्थिती लक्षात घेऊन हळूहळू प्रवासी मर्यादेत शिथिलता देण्यात येणार आहे. मेट्रोमध्ये प्रवास करताना दोन प्रवाशांना 6 फुटांचे अंतर राखणे, थर्मल स्क्रीनिंग करुन प्रवेश मिळवणे यासारखी गोष्टींतून जावे लागणार आहे.
#UNLOCK4 All activities, except the following, shall be permitted outside containment zones: (i) Cinema halls, swimming pools, entertainment parks, theatres (excluding open-air theatre) and similar places. (ii) International air travel of passengers, except as permitted by MHA. https://t.co/029QQHOnNx
— ANI (@ANI) August 29, 2020
दरम्यान, लॉकडाऊनमध्ये सामाजिक, धार्मिक आणि राजकीय कार्यक्रमांना घातलेली बंदी 21 सप्टेंबरपर्यंत कायम राहणार आहे. फक्त 100 लोकांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, मर्यादीत लोक असले तरी सोशल डिस्टन्सिंगचे नियम आणि पाळणं बंधनकारक असेल. यामध्ये मास्क घालणं, सुरक्षित अंतर ठेवणं याचं पालन करावं लागेल. तसंच उपस्थितांचे थर्मल स्क्रीनिंग आणि हँडवॉश, सॅनिटायझर ठेवण्यात यावं असंही म्हटलं आहे.
प्रवासावेळी या गोष्टींची खबरदारी घ्यावी लागले
– मास्क वापरणे बंधनकारक असेल
– सोशल डिस्टन्सिंगच्या नियमावलीचे पालन करताना प्रवाशांना एकमेकांपासून 6 फूट अंतर ठेवावे लागेल
-आजाराने त्रस्त व्यक्तीला मेट्रोने प्रवेश करता येणार नाही
-मेट्रोमध्ये दोन प्रवाशांमध्ये एक सीट रिकामे ठेवावे लागेल
-मोबाइलमध्ये आरोग्य सेतू अॅप अनिवार्य असेल
-गर्दी वाढल्यास प्रवेश बंद केला जाईल
-मार्चनंतर पहिल्यांदा 21 सप्टेंबरपासून धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनाला 100 लोकांच्या उपस्थितीत परवानगी मिळेल.
– इयत्ता 9 ते 12 वी च्या विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या मार्गदर्शनासाठी इच्छेनुसार शाळेत जाण्यास परवानगी दिली जाईल. विद्यार्थ्यांना बाहेर पाठवावे की नाही यासाठी पालकांची समंती अनिवार्य असेल.
– चित्रपटगृहे, स्विमिंग पूल, आंतरराष्ट्रीय हवाई वाहतून (काही विशेष सेवा सोडून) बंदच राहणार
– सरकारने 30 सप्टेंबरपर्यंत शाळा आणि महाविद्यालये बंद राहतील, असे स्पष्ट केले आहे. कंटेनमेंट झोनबाहेरील 9 ते 12वी चे विद्यार्थी पालकांच्या संमतीने शाळेत जाऊ शकतील.
– राज्य आणि केंद्र शासित प्रदेशात 50% शिक्षक स्टाफ ऑनलाइन टीचिंग आणि संबंधित कार्यासाठी शाळेत जाऊ शकतात.
– 21 सप्टेंबरपासून सामाजिक, राजनीतिक, मनोरंजन, खेळ आदि क्षेत्राशी संबंधीत कार्यक्रमालाही परवानगी देण्यात येईल. या कार्यक्रमाला 100 लोकांनाच एकत्रित येता येईल.