विकासाचा नवा पॅटर्न; बारामतीत होणार ५० एकरावर राज्यातील सर्वात मोठं पोलीस उपमुख्यालय!

Spread the love

बारामती | बऱ्हाणपूर येथे होत असणाऱ्या पोलिस उपमुख्यालयाला राज्याच्या गृहमंत्रालयाने शुक्रवारी मंजुरी दिली आहे. ५० एकरावर हे उपमुख्यालय उभारण्यात येणार आहे. या उपमुख्यालयाच्या निमित्ताने बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. अप्पर पोलीस अधिक्षकांच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोलीस मुख्यालयातून बारामती येथील पोलिस बंदोबस्त येईपर्यंत तेथील परिस्थिती आटोक्यात आणणे अत्यंत अडचणीचे होत असते. त्यामुळे गुन्हेगारीवर नियंत्रण राखणे व कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून बऱ्हाणपूर येथे पोलीस उपमुख्यालय कार्यरत होणार आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील आठ उपविभाग व त्यांच्या अंतर्गत असणाऱ्या २८ पोलीस ठाण्याचा समावेश असणार आहे.

जिल्हा उपमुख्यालयात यांचा समावेश
◆ ट्रेनिग सेंटर
◆ प्रशासकीय भवन
◆ विभाग निहाय कर्मचारी निवास्थाने
◆ पोलीस हॉस्पिटल
◆ मोटार परिवहन विभाग
◆ शॉपिंग सेंटर
◆ बहूद्देशीय हॉल
◆ परेड मैदान
◆ गोळीबार मैदान
◆ पोलीस अधिकारी व कर्मचारी
◆ विश्रांतीगृह
◆ स्विमिंग पूल
●प्राथमिक कामकाजासाठी २ कोटी मंजूर●

बारामती तालुक्यात बऱ्हाणपूर येथे ५० एकर क्षेत्रांवर जिल्हा उपमुख्यालय उभारण्यात येणार आहे. प्राथमिक बाब म्हणून संरक्षण भिंत व प्रवेशद्वार उभारण्यासाठी लागणाऱ्या २ कोटी खर्चास मजुरी देण्यात आली होती.
पुणे जिल्ह्याच्या दक्षिण भागात कायदा सुव्यवस्था व प्रशासकीय नियंत्रण या दृष्टिकोनातून पुरेसा बंदोबस्त सारखा पुरवावा लागतो असतो. याठिकणी उपमुख्यालय झाल्यास वेळेत बंदोबस्त पुरवणे सोयीचे होणार आहे. तसेच कायदा सुव्यवस्था राखणे सोपे जामार आहे.

– उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती.
पुणे ग्रामीण जिल्ह्यातील पोलीस ठाण्याचे कार्यक्षेत्र, मुख्यालयापासूनचे अंतर, पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये लोकसंख्येमध्ये व गुन्ह्याच्या संख्येमध्ये झालेली खूप वाढ, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोलीस मुख्यालयातून बारामती येथील पोलीस बंदोबस्त येईपर्यंत तीन ते साडेतीन तासांचा कालावधी जातो. त्यामुळे स्थानिक पोलिसांना अपुरे मनुष्यबळाअभावी तेथील परिस्थिती आटोक्यात आणणे खुप अडचणीच होत. त्यामुळे बऱ्हाणपुर येथे पोलीस उपमुख्यालय स्थापन करणेबाबतचा प्रस्ताव पोलीस महासंचालक कार्यालयाने सादर केला होता. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने बऱ्हाणपूर येथे पोलीस उपमुख्यालय निर्माण करण्यास विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात येत आहे. पोलीस उपमुख्यालयाकरिता आवश्यकपद निर्मितीबाबतचे आदेश स्वतंत्रपणे तयार करण्यात येतील. बऱ्हाणपूर येथील पोलीस उपमुख्यालयाकरिता प्रशासकीय इमारत व इतर अनावर्ती खर्च हा सक्षम प्राधिकाऱ्यांची मान्यता घेऊन वार्षिक योजनेमधुन भागविण्यात येणार आहे.

सध्या कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने महत्वाची भूमिका बजावणारे ग्रामीण जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवर अप्पर पोलीस अधीक्षक, पुणे अप्पर पोलीस अधीक्षक बारामती ही दोन कार्यालय आहेत. पुणे जिल्ह्यातील अप्पर पोलिस अधीक्षक बारामती यांचे कार्यक्षेत्रात बारामती,हवेली, भोर, दौंड या चार उपविभागांचा समावेश आहे. तर अप्पर पोलीस अधीक्षक पुणे यांचे कार्यक्षेत्रात लोणावळा, देहुरोड, खेड, जुन्नर या चार उपविभागांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये अप्पर पोलिस अधीक्षक बारामती यांचे कार्यक्षेत्रात मोठमोठ्या शैक्षणिक संस्था, उजनी, वीर,भाटघर ही महत्वाची धरणे आहेत. सोमेश्वर, जेजुरी, मोरगाव, थेऊर, रांजणगावही प्रमुख तीर्थक्षेत्र असून जिल्ह्यातील अति महत्त्वाची ठिकाणे आहेत.बारामती येथे विमानतळ, दौंड येथील रेल्वे जंक्शन, लोणी काळभोरला पेट्रोलियम पदार्थांचा साठा आहे. प्रशासकीय नियंत्रण या दृष्टिकोनातून पुरेसा बंदोबस्त सारखा पुरवावा लागतो असतो. त्यामुळे कायदासुव्यव्स्थेंचा प्रश्न मार्गी लावण्याच्या उद्देशाने पुणे उपमुख्यालयाचीउभारणी करण्याचा मार्ग आता सुकर झाला आहे.बारामती उपविभाग अंतर्गत 19 पोलीस स्टेशन आहेत. अधिकच्या बंदोबस्तासाठी या उपमुख्यालयाचा फायदा होणार आहे. 300 कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाची सोय करण्यात येणार आहे. प्रशासकीय इमारत होणार आहे. अप्पर पोलीस अधीक्षक तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे कामकाज उपमुख्यालयातून चालणार आहे. ऑफिशियल ट्रेनिंग सेंटरची निर्मिती होणार आहे.

गोळीबार सराव केंद्र, परेड ग्राउंड, हेलिपॅड बनणार आहे. कॅन्टीन, मल्टीपर्पज हॉल, विश्रांतीगृह बांधण्यात येणार आहे. बारामती उपविभागामध्ये पोलीस उपमुख्यालयाची आवश्‍यकता होती. कायदा व सुव्यवस्था हाताळण्याच्या दृष्टिकोनातून हे उपमुख्यालय महत्त्वाचे आहे.नव्या पोलिस उपमुख्यालयासाठी लागणाऱ्या आवश्यक पदनिर्मितीबाबतचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येतील. मौजे बऱ्हाणपूर येथील पोलिस उपमुख्यालयाचे क्षेत्र व सीमा घोषित करण्याबाबत अधिसूचना यथावकाश जारी करण्यात येईल. या पोलिस उपमुख्यालयासाठी प्रशासकीय इमारत आणि आनुषंगिक खर्चासाठी लागणारा निधी हा सक्षम प्राधिकाऱ्यांची मान्यता घेऊन वार्षिक योजनेमधून भागविण्यात यावा, असे गृह विभागाने शुक्रवारी जारी केलेल्या शासननिर्णयात स्पष्ट नमूद केले आहे.• बारामतीपासून सात किलोमीटर अंतरावर बऱ्हाणपूर
• सत्तर एकर जागा उपलब्ध होणार, या पैकी 50 एकर जागा ताब्यात घेणार.
• प्रशासकीय इमारत, परेड ग्राऊंडची निर्मिती होणार.
• उपमुख्यालयात हेलिपॅडचीही निर्मिती होणार.
• 300 कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांच्या इमारती होणार.
• प्रशिक्षण केंद्र कँटीन मल्टीपर्पज हॉल.
• गोळीबार सराव केंद्र.
• पोलिस वाहनतळ व देखभाल व दुरुस्ती.
• संरक्षक भिंत उभारणीची निविदा प्रक्रिया सुरु.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुणे ग्रामीण पोलिस दलाचे उपमुख्यालय बारामतीत व्हावे यासाठी गेल्या दहा वर्षांपासून प्रयत्नशील होते. मागील भाजप-सेना युती शासनाच्या काळात या कामाला ब्रेक लागला होता. मात्र तत्पूर्वी आघाडी शासनाच्या काळात जागा निश्चिती करण्यात आली होती. या ठिकाणी मुख्यालयाची देखणी इमारत लवकरच उभी राहणार आहे.

बारामती तालुक्यात राजकिय, शैक्षणिक, औद्योगिक व इतर कारणांमुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त लागतो. तो इतर ठिकाणाहून मागवावा लागतो. पुणे जिल्ह्यातील दक्षिणेकडील हद्दीपर्यंत बंदोबस्त द्यावा लागत असल्याने अनेकदा विलंब होतो. या दरम्यान काही अघटीत घडल्यास उपलब्ध मनुष्यबळावर त्याचा विपरित परिणाम होतो. यासाठी बारामती शहरानजीक बऱ्हाणपूर येथे उपमुख्यालय स्थापनेचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला होता. त्याला राज्याच्या गृह विभागाने मान्यता दिली. त्यामुळे बऱ्हाणपूरला उपमुख्यालय होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

बऱ्हाणपूर येथील उपमुख्यालयासाठी आवश्यक पदनिर्मितीबाबतचे आदेश स्वतंत्रपणे शासनाकडून काढले जाणार आहेत. या उपमुख्यालयाची सीमा यापुढील काळात घोषित करण्यात येईल. परंतु सध्याच्या बारामतीच्या अप्पर पोलिस अधिक्षकांचे कार्यक्षेत्र या उपमुख्यालयांतर्गत येण्याची शक्यता आहे. सध्या बारामतीच्या अप्पर पोलिस अधिक्षकांकडे बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, शिरुर व भोर तालुक्याचा भाग येतो. हाच भाग बारामती उपमुख्यालयाला जोडला जाईल, अशी चिन्हे आहेत. बारामतीला विकासाच्या बाबतीत जगाच्या नकाशावर आणली फक्त दादांनी

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.