शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींना उजाळा देत उद्धव ठाकरे झाले भावूक!

Spread the love

मुंबई | आजपर्यंत आपण एकला असाल बंदुका आणि तलवारीच्या मदतीने इतिहास घडतात. मात्र कुंचल्याच्या सामर्थ्याने इतिहास घडवणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब हे एकमेव होते असं भावनिक उद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यांनी केलं आहे. बातमीचा मतितार्थ दाखवणारं व्यंगचित्र असतं. हजार शब्दांचं काम एक व्यंगचित्र करतं असं बाळासाहेब नेहमीच म्हणायचे. तो काळ अशा व्यंगचित्रांचा आणि व्यंगचित्रकारांचा होता. राजकीय भाष्य करणारं व्यंगचित्रकार आता कमी झाले आहेत आता ती उणीव भासते असंही त्यांनी म्हटलं. मार्मिकचा वर्धापन दिन सोहळा आज पार पडला. त्या सोहळ्यात त्यांनी हे वक्तव्य केलं. ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या सोहळ्यात सहभागी झाले होते. सध्याच्या घडीला करोनाचं संकट आहे मोठं आहे. आपण सगळे त्याला लढा देतो आहे. लढा देणं ही आपली प्रवृत्ती आहे. आपण या संकटासोबतही जिंकू असा मला विश्वास आहे असंही ते म्हणाले.

मार्मिकचा जन्म हा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या निमित्ताने झाला. अजूनही कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र आपल्यात आलेला नाही. त्यामुळे तो लढा सुरुच आहे. मार्मिक हे जगातलं पहिलं साप्ताहिक आहे ज्या साप्ताहिकाने आपला हिरक महोत्सव ऑनलाइन पद्धतीने साजरा केला असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. सध्या ऑनलाइनचं युग आहे. मार्मिकही लवकरच डिजिटल अर्थात ऑनलाइन रुपात आपल्या भेटीला येणार आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या वेळी मुंबई महाराष्ट्राने मिळवली होती ही आठवणही उद्धव ठाकरेंनी सांगितली. मराठी माणूस हा अन्याय करणार नाही, मात्र जो आपल्यावर अन्याय करेल त्याला आपण सोडणार नाही ही आपली वृत्ती आहे ही अशीच असली पाहिजे असंही त्यांनी म्हटलं आहे. शिवसेनाप्रमुखांनी सामर्थ्य दाखवलं ते त्यांच्या कुंचल्यावरचं सामर्थ्य होतं. त्या कुंचल्याचे फटकारे अनेकांना बसले आहेत. मराठी माणसाने लढा दिला आहे. मुंबई मिळवली आहे. मुंबईकरांना आणि मराठी माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी हे मार्मिक सुरु झालं असंही उद्धव ठाकरेंनी यावेळी आवर्जून सांगितलं.

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.