कोरोनाचं हे तुफान उधळून लावू, लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय; पंतप्रधान नरेंद्र मोदी!

Spread the love

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं. देशाला लॉकडाऊनपासून वाचवायचं आहे. त्यासाठी  सर्वांनी नियम पाळायला हवेत. लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय आहे, असं मोदी म्हणाले. देशातील कोरोनाबाधितांचा वाढता आकडा लक्षात घेता पंतप्रधान गेल्या काही दिवसांपासून विविध घटकांशी चर्चा करत आहेत. मोदींची आज लस उत्पादन कंपनीशी चर्चा झाली, त्यानंतर मोदींनी देशाला संबोधित केलं.

जनभागीदारीतून कोरोनाचं हे तुफान उधळून लावू. या संकटाच्या काळात देशवासियांनी पुढे यावं आणि गरजवंतांना मदत करा. समाजाचा पुरुषार्थ आणि सेवाभावनेतून ही लढाई जिंकू शकू, असं नरेंद्र मोदींनी सांगितलं. देशाला लॉकडाऊनपासून तुम्हीच वाचवू शकता. लॉकडाऊन हा अंतिम पर्याय आहे. लॉकडाऊन लावण्याची वेळ येऊ नये, असं मोदी म्हणाले.

तरुणांना आवाहन 

“माझी तरुणांना विनंती आहे. त्यांनी आपल्या सोसायटी, परिसरात छोटी कमिटी बनवून कोव्हिड नियम लागू करण्यासाठी मदत करावी. आपण तसं केलं तर लॉकडाऊन लावण्याची आवश्यकता लागणार नाही. स्वच्छता अभियानसाठी पाचवी ते दहावीच्या बालमित्रांनी खूप मदत केली होती. त्यांनी घरच्यांना आणि लोकांना स्वच्छतेचा संदेश दिला होता. आज त्यांना मी विनंती करतो, घरात असं वातावरण तयार करा की, घरातील लोक विनाकारण घराबाहेर पडू नये. प्रसारमाध्यामांनीही लोकांना सतर्क करण्यासाठी सुरु असलेले प्रयत्न आणखी वाढवावे. तसेच लोकांमध्ये भीती आणि अफवा वाढू नये. याची काळजी घ्यायची आहे. आपल्याला देशाला लॉकडाऊनपासून वाचवलायचं आहे. राज्यांनी शेवटच पर्याय म्हणून लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा”, असं पंतप्रधान म्हणाले.

कोरोना विरोधात लढण्यासाठी अनुशासनाची गरज’

“कोरोना विरोधात लढण्यासाठी अनुशासनाची गरज आहे. गरज असेल तरच बाहेर पडा. मला आपल्याला विनंती करतो. तुमचं धैर्य आणि साहसामुळे आजच्या परिस्थिती बदलण्यास देश कोणतीही कसर सोडणार नाही. आपलं कटुंब आणि तुम्ही निरोगी राहा”, असं मोदी म्हणाले.

‘देशाला लॉकडाऊन पासून वाचवायचं आहे’

“माझी तरुणांना विनंती आहे. त्यांनी आपल्या सोसायटी, परिसरात छोटी कमिटी बनवून कोव्हिड नियम लागू करण्यासाठी मदत करावी. आपण तसं केलं तर लॉकडाऊन लावण्याची आवश्यकता लागणार नाही. स्वच्छता अभियानसाठी पाचवी ते दहावीच्या बालमित्रांनी खूप मदत केली होती. त्यांनी घरच्यांना आणि लोकांना स्वच्छतेचा संदेश दिला होता. आज त्यांना मी विनंती करतो, घरात असं वातावरण तयार करा की, घरातील लोक विनाकारण घराबाहेर पडू नये. प्रसारमाध्यामांनीही लोकांना सतर्क करण्यासाठी सुरु असलेले प्रयत्न आणखी वाढवावे. तसेच लोकांमध्ये भीती आणि अफवा वाढू नये. याची काळजी घ्यायची आहे. आपल्याला देशाला लॉकडाऊनपासून वाचवलायचं आहे. राज्यांनी शेवटच पर्याय म्हणून लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा”, असं पंतप्रधान म्हणाले.

कोरोनाचं हे तुफान उधळून लावू

जनभागीदारीतून कोरोनाचं हे तुफान उधळून लावू. या संकटाच्या काळात देशवासियांनी पुढे यावं आणि गरजवंतांना मदत करा. समाजाचा पुरुषार्थ आणि सेवाभावनेतून ही लढाई जिंकू शकू.

युवकांनी आपल्या भागात छोट्या समित्या बनवाव्या आणि कोरोना नियम पाळण्यासाठी आवाहन व्हावं. त्यामुळे सरकारने कंटेन्मेंट झोन किंवा कर्फ्यू किंवा लॉकडाऊन लावण्याची वेळ सरकारवर येणार नााही.

जगातील सर्वात स्वस्त लस भारतात – मोदी

आपण सौभाग्यशाली आहे, आपल्याकडे मजबूत फार्मा सेक्टर आहे, जो वेगवान औषधं बनवत आहेत, रुग्णालयांमध्ये बेड संख्या वाढवत आहोत.आज जगातील सर्वात स्वस्त लस भारतात आहे. त्याची साठवणूकही योग्य होत आहे. त्यामुळेच भारतात मोठ्या प्रमाणात लसीकरण होत आहे. आता देशात १ मे पासून १८ वर्षावरील सर्वांना कोरोना लस देण्यात येणार आहे. यामुळे शहरात जे काम करत आहेत, त्यांना सर्वांना लस मिळेल.

माझी राज्य सरकारला विनंती आहे, त्यांनी कामगारांना विश्वास द्यावा. ते जिथे असतील तिथेच राहावं यासाठी आवाहन करावं. त्यामुळे त्यांचं कामही सुरु राहील आणि लसीकरणही होईल.

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.