वेळ संपली, अवैध धंद्यासह अत्यावश्यक दुकानदार सोडून इतरही दुकाने मस्त; मात्र प्रशासन सुस्त!

Spread the love

परवेज मुल्ला
मुंबई | उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब हे शहर जगलेले असून, कळंब शहरात येण्या साठी अधिकारी पैसे मोजतात न जाण्यासाठी पैसे मोजतात असे चर्चेत असतानाही, मात्र कळंब शहर हे सदैव गुन्हेगारीचे शहर म्हणून ओळखले जात आहे, अद्याप ही गुन्हेगारी संख्या मोजली जात आहे. करोना काळात अवैध धंद्यासह आजही करोनाचि संख्या वाढत असल्याने प्रशासन मात्र सुस्त असल्याचे दिसून येत आहे.

महाराष्ट्रात कोरोनाच्या डेल्टा प्लस विषाणूचा वाढता धोका लक्षात घेता राज्य सरकारने सोमवार 28 जून 2021 पासून पुन्हा एकदा कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. संभाव्य तिसरी लाट येण्याचा धोका लक्षात घेता राज्य सरकारने प्रतिबंधात्मक सूचना आणि नियम जाहीर केले आहेत. त्यानुसार ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत 4 जून 2021 पासून लागू करण्यात आलेल्या निर्बंधात विस्तार करण्यात आला आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यांचा समावेश दुसऱ्या स्तरातून तिसऱ्या स्तरात करण्यात आला आहे. या ठिकाणी सर्व दुकाने सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. तर अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त इतर वस्तूंचा व्यवहार करणाऱ्या आस्थापना सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील. मॉल्स, सिनेमागृह, मल्टिप्लेक्स बंद राहणार आहेत. रेस्टॉरंट सोमवार ते शुक्रवार 50% क्षमतेने सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील. तरीही उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब शहरात रुग्ण संख्या वाढत असतानाही 4 वाजे नंतर ही अत्यावश्यक सेवा सोडून हि अवैध धंद्या सहित इतरही दुकाने सुरू असल्याने प्रशासन मात्र मूग गिळून गप्प आहे. याचे कारण मात्र कळंब वासियातून नेमके दोषी प्रशासन कोणते हे चर्चिले जात आहे.

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.