‘म्युकोरमायकोसिस’ पासून वाचण्यासाठी ‘हे’ उपाय करा, तुमच्या जवळही येणार नाही; वाचा सविस्तर!
मुंबई | कोरोणातून बरे होऊन परतल्यानंतर म्युकोरमायकोसिस या बुरशीजन्य विषाणूची लागण होत आहे. आणि याची लागण झाल्याने अनेकांना प्राण गमवावे लागत आहेत. तर काहींना दृष्टी गमवावी लागत आहे. मात्र न घाबरता, या विषाणूची लक्षणे आढल्यावर आपण जर योग्य उपचार घेतले तर यापासून बचाव होऊ शकतो. मात्र उपचार घेण्यासाठी जर उशीर झाला तर आपल्याला प्राण देखील गमवावे लागतील. एखाद्या व्यक्तीच्या रक्तात साखर आहे. व त्याचे शरीर एखाद्या रोगा विरोधात लढण्यास सक्षम नाही, अशा व्यक्तीला या व्हायरसची बाधा होते. यापासून जास्त संसर्ग होत नाही.
या म्युकोरमायकोसिस बुरशीजन्य व्हायरसला मराठीत काळी बुरशी असा शब्द आहे. या काळया बुरशीचे जंतू आपल्या शरीरात नाका वाटे प्रवेश करतात. व आपल्या रक्तातील साखर खाऊन विकसित होतात. आणि हळू – हळू मेंदूकडे जातात. मेंदूकडे जाण्याच्या अगोदर ते डोळ्याला इजा करतात. आणि त्यानंतर त्यांचा प्रवास मेंदूकडे सुरू होतो. डोळा आणि मेंदूच्या मध्ये एक पेपरच्या पाना एवढा हाडाचा भाग आडवा असतो. मात्र जर जास्त काळ झाला असेल तर तो हाडांचा भाग तोडून हा विषाणू मेंदूला घात करतो, आणि जीवनयात्रा संपवितो. मात्र हा कशामुळे होते याचे नेमके कारण आणखी समोर आले नाही.
मात्र डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार कोरोनावर उपचार घेत असलेल्या वेळी स्टेरोईड या इंजेक्शनाचा जास्त डोस झाल्याने होतो. ही काळी बुरशी जुना व्हायरस आहे. या व्हायरसचा वावर हा मातीत देखील असू शकतो. मात्र एखाद्या व्यक्तीची रोग प्रतिकारक क्षमता कमी झाली की या विषाणूची बाधा त्या व्यक्तीला होतो. मात्र या विषाणू पासून वाचण्यासाठी काही महत्वाचे मुद्दे आहेत. त्याचे पालन केल्यास आपला यापासून बचाव होऊ शकतो. ज्यांची रोगप्रतिकारक क्षमता आहे त्यांना भीती कमी प्रमाणात आहे.
• यापासून वाचण्यासाठी काय करावे?
१) पूर्ण अंग भरेल एवढे कपडे घालावेत. २) जास्त मातीत वावरू नये. ३) स्वच्छ रहावे. ४) स्टेरोईड इंजेक्शन जास्त घेऊ नये. ४) रक्तातील साखर नियंत्रित ठेवावी. ५) धूळ असलेल्या ठिकाणी मास्क वापरणे. ६) आवश्यक असेल तरच ॲन्टीफंगल औषधे वापरा.
• म्युकोरमायकोसिस या विषाणूची लक्षणे?
१) डोळ्यानी डबल दिसणे. २) डोळा सुजणे. ३) रक्ताच्या उलट्या होणे. ४) तोंडावर काळे डाग पडणे.