स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील येसूबाई फेम प्राजक्ता गायकवाड लवकरच नव्या रुपात आपल्या भेटीला!

Spread the love

मुंबई | छोट्या पडद्यावर प्रचंड गाजलेली मालिका म्हणजे ‘स्वराज्यरक्षक संभाजी’. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. मात्र यातील येसूबाईंची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीने प्रेक्षकावर भूरळ घातली. अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिने येसूबाई ही भूमिका साकारली होती.विशेष म्हणजे ऐतिहासिक भूमिका साकारल्यानंतर प्राजक्ता पहिल्यांदाच एका नव्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. या नव्या भूमिकेसाठी प्राजक्ता प्रचंड मेहनत करत असून तिच्या बराचसा बदल झाल्याचं दिसून येत आहे. ऐतिहासिक भूमिका साकारल्यानंतर प्राजक्ता पहिल्यांदाच तिच्या वयाला साजेशी भूमिका करणार आहे. ‘आई माझी काळूबाई’ या आगामी मालिकेत प्राजक्ता एका महाविद्यालयीन मुलीच्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्यामुळे प्राजक्ता तिच्या फिटनेसकडे लक्ष देताना दिसत आहे.

‘आई माझी काळूबाई’ या मालिकेत प्राजक्ता आर्या ही भूमिका साकारत आहे. त्यामुळे या नव्या भूमिकेला न्याय देण्यासाठी प्राजक्ताने तिचं वजन कमी केलं आहे. सोबतच तिने तिच्या हेअरस्टाइलमध्येही बदल केल्याचं दिसून येत आहे. सध्या या नव्या मालिकेचं साताऱ्यामध्ये चित्रीकरण सुरु आहे.

https://instagram.com/its_prajaktaa?igshid=111zjwthcrdtr

दरम्यान, ‘आई माझी काळुबाई’ ही मालिका आर्याच्या भक्तीची आणि काळुबाईच्या शक्तीची गोष्ट आहे. या मालिकेत काळुबाईच्या भूमिकेत अभिनेत्री अलका कुबल झळकणार आहेत. ही मालिका येत्या १४ सप्टेंबरपासून सोनी मराठी या वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.