श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्याच्या उस्मानाबाद कळंब तालुका कार्याध्यक्ष पदी अमर भारत चोंदे यांची तर उपाध्यक्षपदी अशोककुरुंद यांची निवड!

Spread the love

परवेज मुल्ला, उस्मानाबाद : श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्याच्या वतीने ट्रस्ट चे संस्थापक/अध्यक्ष मा. श्री भूषण सुर्वे यांच्यामार्गदर्शनाखाली महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गरजू व्यक्तीला मोफत रक्त मिळवून देण्याची संकल्पना आम्ही राबवत आहे. म्हणून शिवशंभू ट्रस्ट वरतीविश्वास ठेऊन मोठ्या प्रमाणात रक्तदान करतात. हीच गोष्ट लक्षात घेऊन श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्रच्या कळंब तालुक्यातीलपदनियुक्ती पार पडल्या कळंब तालुका कार्याध्यक्ष पदी अमर भारत चोंदेयांची उपाध्यक्षपदी शिवश्री अशोक उत्रेश्वर कुरूंद, तालुका अध्यक्षपदी प्रशांत गायकवाड,तालुका संघटक पदी अमोल मोरे यांची निवड निवडीबद्दल  पांडूरंग कुरूंद, नितीन रणदिवे, सचिन वाघमारे, दयानंदरणदिवे, राहुल कुरूंद, शंकर कुरूंद, शुभम राखुंडे, बालाजी सुरवसे, परमेश्वर पालकर, अतुल गायकवाड आदींनी त्यांचे स्वागत केले शुभेच्छादिल्या यांचे अभिनंदन होत आहे.

संपूर्ण महाराष्ट्राला शिवशंभू ट्रस्टच्या रक्तदानाबद्दल माहिती आहे लॉकडाऊन च्या काळातही शिवशंभू ट्रस्टने रक्ताच्या तुटवड्यापासूनमहाराष्ट्राला वाचविले होते, ज्या ज्या लोकांनी आजपर्यंत ट्रस्ट वरती विश्वास ठेऊन रक्तदान केले आहे अश्या लोकांना वेळोवेळी शिवशंभू ट्रस्टच्या माध्यमातून मदत झाली आहे त्यामुळे हे सर्व लक्षात घेऊनच लोक जिथे जिथे शिवशंभू ट्रस्टच्या माध्यमातून रक्तदान शिबीर असतील तिथेतिथे रक्तदान करतात हे मात्र आता नक्की झाले आहे असे यावेळी काही रक्तदात्यांची ज्यांना मोफत बॅग मिळाली आहे अश्या रुग्णांनीबोलताना सांगितले.

त्याचसोबत  ट्रस्टच्या सर्वच नवीन जुन्या पदाधिकाऱ्यांनी जोमाने काम करून हा संकल्प यशस्वी केल्याबद्दल सर्वांचे आभार देखील मानले यापुढे हा रक्तदानाचा संकल्प चालूच राहील असे यावेळी ट्रस्ट कमिटीच्या वतीने नमूद करण्यात आले.

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.