श्री शिवशंभू ट्रस्टच्या कार्य अहवालाचे महाराष्ट्रभर अनेक आमदार, खासदार व मान्यवरांच्या हस्ते होतेय प्रकाशन! - MahaMetroNews Best News Website in Pune

श्री शिवशंभू ट्रस्टच्या कार्य अहवालाचे महाराष्ट्रभर अनेक आमदार, खासदार व मान्यवरांच्या हस्ते होतेय प्रकाशन!

Spread the love

श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्टच्या सामाजिक कार्याच्या अहवालाचे महाराष्ट्रभर पोहचविण्याचे काम चालू आहे. रक्तदान आणि हॉस्पिटलच्या माध्यमातून धावपळीच्या या काळात प्रत्येक पदाधिकारी रात्रीचा दिवस करून कामाची साथ देत आहे हे कार्य लोंकापर्यंत पोहचत नसल्याचे पाहून कार्यअहवाल जनमानसात पोहचविण्याचे काम सर्वांकडून होत आहे.

कल्याण लोकसभेचे विद्यमान खा. मा. श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या हस्ते करमाळा येथे कार्यअहवालाचे प्रकाशन पार पडले. साहेबांनि कार्याचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. यावेळी श्री शिवशंभू ट्रस्टचे संस्थापक/अध्यक्ष शिवश्री भूषण सुर्वे, श्री शिवशंभू ट्रस्टचे करमाळा तालुका अध्यक्ष, मा.संजय सरडे, मा.अंगद भांडवलकर (ता.उपाध्यक्ष), मा.उमेश सूर्यवंशी(शहर अध्यक्ष), मा.सुनील जगदाळे (ता.कार्याध्यक्ष), मा.नितीन गोफणे (ता.संपर्कप्रमुख) व करमाळा शहरातील आणि तालुक्यातील पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

पुण्यामध्ये शिवसेना वैद्यकीयच्या पदाधिकारी मिटिंग नंतर मा. मंगेश चिवटे सर, मूळ संकल्पना तथा निर्माता-मुख्यमंत्री सहायता कक्ष मंत्रालय, सदस्य-महात्मा फुले जन आरोग्य योजना महा राज्य यांच्या हस्ते कार्यअहवालाचे प्रकाशन करण्यात आले त्यावेळी सरानी शुभेच्छा दिल्या व कार्याचे कौतुक केले.

यावेळी वैद्यकीय मदत कक्षाचे जितेंद्र सातव, मा. राजाभाऊ भिलारे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, पश्चिम महाराष्ट्र प्रमुख, प्रचार-प्रसिद्धी प्रमुख, बारामती-सातारा-माढा लोकसभेचे आदिराज कोठाडिया, श्री शिवशंभू ट्रस्टचे संस्थापक/अध्यक्ष शिवश्री भूषण सुर्वे पुणे उपशहर प्रमुख अजय सपकाळ, जितेंद्र होले, कुणाल कांदे, यावेळी उपस्थित होते.

 

मा. राजेंद्र पाटील-यड्रावकर साहेब, राज्यमंत्री – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, महाराष्ट्र राज्य मंत्रालय यांच्या हस्ते करमाळा येथे कार्यअहवालाचे प्रकाशन घाई गडबडीमध्ये वेळ दिल्यामुळे पार पडले. साहेबांनि कार्याचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

यावेळी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख मंगेशजी चिवटे सर, श्री शिवशंभू ट्रस्टचे संस्थापक/अध्यक्ष शिवश्री भूषण सुर्वे, श्री शिवशंभू ट्रस्टचे करमाळा तालुका अध्यक्ष, मा.संजय सरडे, मा.अंगद भांडवलकर (ता.उपाध्यक्ष), मा.उमेश सूर्यवंशी(शहर अध्यक्ष), मा.सुनील जगदाळे (ता.कार्याध्यक्ष), मा.नितीन गोफणे (ता.संपर्कप्रमुख) व करमाळा शहरातील आणि तालुक्यातील पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

 

पुण्यामधील मा.सनी विनायक निम्हण, मा.नगरसेवक यांच्या हस्ते कार्यअहवालाचे प्रकाशन करण्यात आले. सोबत मा.अमित ज्ञानेश्वर मुरकुटे, मा.सदस्य शिक्षण मंडळ पुणे म.न.पा व शिवशंभू ट्रस्टचे संस्थापक/अध्यक्ष शिवश्री भूषण सुर्वे यावेळी उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रशांतजी शितोळे, यांच्या हस्ते कार्यअहवालाचे प्रकाशन करण्यात आले. सोबत मा.संदीपजी शितोळे, निखिल चव्हाण, कपिल जाधव व शिवशंभू ट्रस्टचे संस्थापक/अध्यक्ष शिवश्री भूषण सुर्वे यावेळी उपस्थित होते.

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.
WhatsApp Group