स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतून छत्रपती शिवाजी महाराज म्हणून ओळख निर्माण करणारे शंतनू मोघे; लवकरचं आपल्या नवीन मालिकेतून भेटीला!

Spread the love

मुंबई | स्वराज रक्षक संभाजी या मालिकेत शंतनू मोघे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील काही महत्त्वाची पाने उलगडली , पण त्यासोबत छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या गोष्टींवर प्रकाश टाकला . स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतील शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याची संधी शंतनू मोघे यांनी अत्यंत चांगल्या पध्दतीने पार पाडली होती . आता आपल्याला पाहायला मिळणार आहे स्वराज्य जननी जिजामाता ही मालिका काही वर्षांचा लिप घेणार असून त्या परिने नवनवीन कलाकार आपल्या भेटीला येणार आहेत.

आणि या मालिकेत अभिनेते शंतनू मोघे शहाजीराजे यांची भूमिका साकारणार आहेत . जशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती तेव्हा जो प्रतिसाद आणि कौतुक केलं होतं आता जिजामाता या मालिकेला तसंच भरभरून प्रेम करा .

 

सोबतच सर्वांचा लाडका स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतील दिवेश मेदगे हा संभाजी महाराज यांची भूमिका साकारणारा अभिनेता आता स्वराज्य जननी जिजामाता या छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारणार आहे पाहायला विसरू नका स्वराज्य जननी जिजामाता शहाजीराजे यांची भूमिका शंतनू मोघे कसे पार पाडतील ते पाहण्यासाठी पाहत रहा स्वराज्य घडवणाऱ्या मुलखावेगळ्या आईची गाथा फक्त सोनी मराठी वाहिनीवर सोमवार ते शनिवार रात्री 8.30 वाजता..

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.