आधी सरकार आणि स्वत:चा पक्ष वाचवा; राष्ट्रवादीच्या ‘मिशन घरवापसी’वर भाजपाचा टोमणा!

Spread the love

मुंबई | लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या काळात भाजपामध्ये गेलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना पुन्हा पक्षात आणण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते ‘मिशन घरवापसी’च्या मोहिमेचा प्रचार करत आहेत. यावर भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी राष्ट्रवादीला पार्थच्या वादाच्या संदर्भात, राष्ट्रवादीने आधी आपले घर सांभाळावे, नंतर भाजपाबाबत बोलावे. शेलार म्हणालेत, राष्ट्रवादी काँग्रेस स्वत:च्या घरातले मतभेद लपवण्यासाठी भाजपात गेलेले आमदार राष्ट्रवादीत परत येणार अशा अफवा पसरवते आहे. आपला पक्ष फुटू नये म्हणून राष्ट्रवादीचे नेते या अफवा पसरवत आहेत; पण त्यांच्या या प्रयत्नाला यश मिळणार नाही. जयंत पाटील आणि अजित पवार यांनी स्वत:च्या पक्षात संवाद साधला तरी खूप आहे, असा टोमणा त्यांनी मारला.

आधी सरकार आणि स्वत:चा पक्ष वाचवा, असा टोमणा मारून शेलार म्हणालेत, भाजपाला ना कोणाचा परिवार फोडण्याची इच्छा नाही ना सरकार पाडापाडीत रस आहे. सध्या पार्थ पवारयांच्याबाबत वाद सुरू आहेत.  याबाबत राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक म्हणालेत, पार्थ तरुण नेते आहेत. त्यांचा अनुभव कमी. त्यांचे वक्तव्य गांभीर्याने घेण्यासारखे नाही. तरुणांकडून चुका होतात, त्यात सुधारणा करता येतात.

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.