Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

सातारा जिल्ह्यातील कोरोना रूग्णांना आरोग्यमित्रांची होणार मदत; वाचा सविस्तरपणे!

Spread the love

सातारा | कोरोना संसर्गावरील उपचार करण्यासाठी शासनाने नेमून दिलेल्या खासगी रुग्णालयांत उपचारासाठी जाताना कागदपत्रे बरोबर नेली जात नसल्यामुळे रुग्णांच्या उपचारांचा “क्‍लेम’ करण्यात अडचणी निर्माण होत आहेत. त्यासाठी महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ मिळविण्यासाठी रुग्णांनी आवश्‍यक कागदपत्रे सोबत नेणे आवश्‍यक आहे. केशरी रेशन कार्डधारकांसाठी शासकीय किंवा खासगी दवाखान्यांमध्ये केल्या जाणाऱ्या उपचारांसाठी शासनाची महात्मा फुले जनआरोग्य योजना कार्यान्वित आहे. या योजनेमध्ये विविध प्रकारच्या 996 आजारांवर प्रतिकुटुंब प्रतिवर्ष दीड लाख रुपयांपर्यंत तसेच मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी अडीच लाख रुपयांपर्यंतची मदत मिळते. लाभार्थी कुटुंबातील एक किंवा अनेक व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता येतो. सध्या कोरोना संसर्गाची बाधा देशासह राज्यात मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यामुळे शासनाने कोरोना संसर्गावरील उपचारही या योजनेच्या कक्षात आणले आहेत. शासनाने कोरोना उपचारासाठी नेमून दिलेल्या खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी गेलेल्या नागरिकाला ही सुविधा मिळते.

कागदपत्रे नसल्यामुळे रुग्णांना योजनेचा लाभ मिळवून देण्यात अडचणी येतात. त्यामुळे रुग्णांनी किंवा नातेवाईकांनी दाखल होताना कागदपत्रे सोबत ठेवावीत किंवा त्यांचे मोबाईलमध्ये चांगले छायाचित्र काढून ठेवावे. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर तेथील आरोग्यमित्रांकडे संबंधित कागदपत्रे द्यावीत, असे आवाहन महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे देविदास बागल यांनी “सकाळ’शी बोलताना केले. तसेच अंतर्भूत रुग्णालयात काही अडचणी असल्यास नोडल ऑफिसरशी संपर्क करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

★सातारा जिल्ह्यातील कोरोना हॉस्पिटल आणि आरोग्यमित्रांची यादी पुढीलप्रमाणे..

कृष्णा इन्स्टिट्यूट, क-हाड : डॉ. दिनकर बोर्डे (मो.
9423337347), संभाजी पाटील (8275095430), नीलेश
पाटील (8275095437), अविनाश वीर (8275095445).

शारदा क्लिनिक, क-हाड : डॉ. एस. आर. वायबसे
(9408807081), अमोल यादव (8275095431), नेहा
फलटणकर (8275095448).

सह्याद्री हॉस्पिटल, क-हाड : डॉ. एस. आर. हिंगमिरे
(9823199644), राजेश कळसेकर (9422309284).

घोटवडेकर हॉस्पिटल, वाई : डॉ. एस. पी. इंगवले
(9475988507), प्रकाश साबळे (8275095427).

गीतांजली हॉस्पिटल, वाई : डॉ. कविता खोसे-नोडल ऑफिसर
(9420637583), आरोग्यमित्र- ईरान्ना म्हेत्रे (8275095450).

संजीवन हॉस्पिटल, सातारा : डॉ. मिलिंद ज. मोरे,
(9423034065), ज्योती मोरे (8275095429).

इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स कॉलेज, मायणी : डॉ. दुर्गादास
उंडीगावकर (9822345835), रमेश पवार (8275095443).

जगताप हॉस्पिटल, शिरवळ : डॉ. दर्शन काकडे
(9221084334).

बेल एअर हॉस्पिटल, पाचगणी : डॉ. जयसिंग सिसोदिया
(9579002377).

मंगलमूर्ती हॉस्पिटल, सातारा : पट्टणकुडे अब्दुलगलब
(8275095449) आरोग्यमित्र.

Exit mobile version