रोहित बागडे यांच्या मागणीनंतर रोटरी क्लब ऑफ भिगवन यांचेकडून शेटफळगढे कोविड विलगीकरण कक्षाला 7 बेडस् भेट!

Spread the love

भिगवन | आज बुधवार दिनांक 26 मे 2021 रोजी रोटरी क्लब ऑफ भिगवन व रोटरी क्लब पुणे एनआयबीएम यांच्या संयुक्त विद्यमाने शेटफळगडे येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र ग्रामपंचायत यांच्यावतीने चालवत असलेल्या कोविड विलगीकरण कक्षाला ७ बेडस् भेट देण्यात आले, अशी माहिती अध्यक्ष संपत बंडगर यांनी दिली.

Covid positive आल्यानंतर पॉझिटिव पेशंटने isoletation मध्ये राहणे समाजाच्या दृष्टीने त्याच्या कुटुंबाच्या दृष्टीने महत्त्वाचे असते व त्यासाठी ग्रामपंचायत शेटफळ व आरोग्य उपकेंद्र यांनी मिळून स्वतंत्र वर्गीकरण कक्ष सुरू केला आहे त्यासाठी एक छोटीशी मदत म्हणून 7 बेड रोटरी क्लब ऑफ भिगवण व रोटरी क्लब ऑफ पुणे यांच्या वतीने भेट देण्यात आले, यावेळी रोटरी क्लबच्या अध्यक्ष संपत बंडगर, सचिव रणजित भोंगळे, संस्थापक अध्यक्ष सचिन बोगावत, असिस्टंट गव्हर्नर रियाज शेख, महेश शेंडगे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

ग्रामपंचायत शेटफळच्या वतीने ग्रामविकास अधिकारी बी डी काळे, व डॉ चौधर शेटफळगढे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संतोष वाबळे, उपसरपंच अजित कुंभार, सदस्य सोमनाथ सवाणे, राहुल वाबळे, पिंटू धुमाळ, माऊली वाबळे, रोहित बागडे माजी सरपंच बापू वाबळे यांनी रोटरी सदस्य औदुंबर हुलगे, प्रदीप ताटे, संतोष सोनवणे, अकबर तांबोळी, संजय चौधरी, नामदेव कुदळे, कमलेश गांधी, संजय खाडे सामाजिक कार्यकर्ते मनोज राक्षे या सर्वांचा सत्कार केला. सूत्र संचलन माजी सदस्य दादा साहेब शिरसट यांनी केले..

Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published.

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.