रणसिंगवाडीमधेही शिवशंभू ट्रस्ट व शिवजयंती उत्सव समितीकडून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन!

रणसिंगवाडी | शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट व सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळ रनसिंगवाडी सहयोगाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते 56 रक्त दाते नी रक्तदान केले. श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्याच्या वतीने ट्रस्ट चे संस्थापक/अध्यक्ष मा. श्री भूषण सुर्वे यांच्या मार्गदर्शना खाली महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गरजू व्यक्तीला मोफत रक्त मिळवून देण्याची संकल्पना आम्ही राबवत आहे त्यामाध्यमातून आज ट्रस्टच्या रक्तदान शिबिराची संकल्पना राबवत रणसिंगवडी गावामध्ये शहरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते
शिवशंभु चॅरिटेबल ट्रस्ट आणि हर्ष फाउंडेशन सहयोगामार्फत प्रत्येक रक्तदात्यास 1 लाख रुपयांचा अपघाती विमा अनि प्रमाणपत्र देण्यात आले गावात पाहिलेच रक्तदान शिबिर झाले व युवा वर्गाने चांगलाच प्रतिसाद दिल्या मुळे रक्तदान शिबिर यशस्वी झाले
गावातील महिलानी सुद्धा सहभाग नोदवला.
शिवशंभु चैरिटेबल ट्रस्ट चे महाराष्ट्र संपर्क प्रमुख आप्पा घोरपडे बोलले की गावात पहिला रक्तदान शिबिर खुप जबरदस्त पार पडले असेच गावातील सर्वानी सहकार्य करावे हे महत्वचे आहे, सरकारी आरोग्य योजना गावत वैद्यकीय मदत कक्ष मार्फ़त पुरवन्यात येणार आहेत असेही यांनी यावेळी नमूद केले.