छ. शिवाजी महाराजांच्या ३९१ व्या जयंतीनिमित्त कळंब मध्ये 301 रक्तदात्यांचे रक्तदान; श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्टचे मोलाचे सहकार्य!

Spread the love

परवेज मुल्ला

उस्मानाबाद | . शिवाजी महाराजांच्या ३९१व्या जयंती निमित्तसकल मध्यवर्ती शिवजन्मोत्सव समिती कळंब च्या वतीने रक्तदान शिबीरात ३०१ जणांनी रक्तदान केले असुन या वर्षी सुध्दा कळंबकरांनीरक्तदान शिबीराला भरभरून प्रतिसाद दिला आहे. प्रती वर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा सकल मध्यवर्ती शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने रक्तदानशिबीरात छत्रपती संभाजी राजे व्यापारी संकुल येथे रक्तदान शिबीर घेण्यात आले आहे. जलमंदीर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अजित काळेयांच्या हस्ते फित कापून रक्तदान शिबीराचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी सकल मध्यवर्ती शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष अतुल गायकवाड, यश सुराणा, अॅड. शकुंतला फाटक, नगरसेवक सतीश टोणगे, शितल कुमार घोंगडे, शिवशंभू ट्रस्ट चे परवेज मुल्ला, याकुब पटेल, सुमीतबलदोटा,बाळासाहेब कथले, शिवप्रसाद भडंगे आदींच्या उपस्थितीत करण्यात आले.

     

सकाळ पासुन संततधार पाऊस असताना सुध्दा कळंबकरांनी रक्तदान शिबीराला प्रतिसाद दिला. या मध्ये आमदार कैलास घाडगे पाटील, नगराध्यक्षा सुवर्णा सागर मुंडे, शिवसेना तालुकाप्रमुख शिवाजी कापसे, सागर मुंडे, जलमंदीर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अजित काळेयांच्यासह ३०१ जणांनी रक्तदान केले. या शिबिराला . . उपनगराध्यक्ष संजय मुंदडा, राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य सरचिटणीस तारेख मिर्झासंभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अॅड तानाजी चौधरी, कॉग्रेस चे तालुकाध्यक्ष पांडुरंग कुंभार,संभाजी ब्रिगेड कामगार आघाडी चे जिल्हाअध्यक्ष दत्ताकवडे,प्रा. संजय घुले, शहराध्यक्ष संदीप बावीकर, पत्रकार अशोक शिंदे, युवा सेनेचे सागर बाराते, टिपु सुलतान ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अकिबपटेल,छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड चे इम्रान मिर्झा, प्रताप शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस चे तुषार वाघमारे, बालरोगतज्ज्ञ डॉ रमेश जाधवर, डॉ. अभिजीत जाधवर, यांनी भेट दिली. श्री भगवंत ब्लड बॅक (बार्शी) श्री शिवशंभू  चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने बीड ब्लड बॅंक यांनीरक्तदानदात्यांचे रक्तदान घेतले. यावेळी श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने प्रत्येक रक्तदात्यास ट्रस्टचा लोगो असलेला टीशर्ट प्रमाणपत्रदेण्यात आले. या शिबिरास जलमंदिर प्रतिष्ठाने विशेष सहकार्य केले.

तसेच शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर ज्यांनी रक्तदान केले आहे त्यांना मोफत बॅग मिळणार आहे असे ट्रस्ट चेसंस्थापक/अध्यक्ष शिवश्री भूषण सुर्वे यांनी सांगितले. तसेच आपण शिवशंभू ब्लड फौंडेशन हे अप्लिकेशन गुगल प्ले वरती जाऊन डाउनलोडकरून सहकार्य करावे असेही यावेळी संगणयत आले.

ॲप्लिकेशनची लिंक:👇🏻

https://play.google.com/store/apps/details?id=in.blooddoner

नगरसेवक तथा पत्रकार सतीश टोणगे,कै. पत्रकार सुधाकर सावळे यांच्या स्मरणार्थ शकुंतला फाटक यांनी खाऊ वाटप केले,नारी शक्ती महिलामंच चे ज्योती सपाटे मास्क वाटप केले. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी प्रा. जगदीश गवळी,परवेज मुल्ला, सुमित बलदोटा, बाळासाहेबकथले,यश सुराणा,राहुल चोंदे,बाळू बरकसे, सौरभ जगदाळे, मयूर लोखंडे,अॅड. शकुंतला फाटक, ज्योती सपाटे,प्रविण तांबडे,शितलकुमारघोंगडे, आमर चोंदे, बालाजी सुरवसे समितीच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

प्रास्ताविक प्रा.जगदीश गवळी तर आभार अतुल गायकवाड यांनी मानले.

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.