पुणे आणि मुंबई हाय अलर्ट: मुसळधार पावसाची शक्यता!

Spread the love

पुणे | जून आणि जुलैमध्ये हरवलेला पाऊस आता परतणार आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच पावसाची दमदार एन्ट्री होईल असा अंदाज हवामानखात्याकडून वर्तवण्यात येतोय. या पार्श्वभूमीवर पुढील २४ तासांमध्ये मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. येत्या २४ तासात मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलाय. पुढील दोन दिवसात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे. परिणामी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलाय. केवळ मुंबई कोकणात नव्हे तर मध्यमहाराष्ट्र आणि घाट माथ्यावरही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात येतोय.

गेले काही दिवस मुंबई आणि उनागरात ढगाळ वातावरण आहे. रविवार २ ऑगस्ट आणि सोमवार ३ ऑगस्ट रोजी मुंबई ठाण्यात पावसाच्या सारी कोसळल्या. आता उद्या आणि परवा म्हणजेच ४ आणि ५ तारखेला मुंबई आणि उपनगरं, ठाणे, पालघर त्याचसोबत कोल्हापूर आणि पुण्यातही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.