छत्रपती संभाजीराजेंच्या हस्ते श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्टच्या कार्यअहवालाचे प्रकाशन; कार्याचे केले कौतुक!
पुणे | काल दि 4 जानेवारी रोजी नवीन वर्षाचे औचित्य साधत ट्रस्टचे मार्गदर्शक असलेले तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज माआदरणीय खासदार छत्रपती संभाजी महाराज यांना श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्टचा लेखाजोखा वार्षिक अहवाल सादर करून व्ही व्हीआय पी गेस्ट हाऊस पुणे येथे कोविडचे सावट असताना मोजक्या पदाधिकाऱ्यांच्या सोबत शिवशंभू ट्रस्टचे संस्थापक/अध्यक्ष शिवश्री भूषण सुर्वे, सोनाली जाधव, अमित कुचेकर, राहुल भोसले याच्या उपस्थितीमध्ये अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच महाराजांना आजपर्यंत केलेल्या निस्वार्थ कार्याबद्दल माहिती दिली.
रक्तदान क्षेत्रात श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट आपल्या नांवा प्रमाणे काम करत आहे असं छत्रपती संभाजी महाराज म्हणाले त्याचप्रमाणेमहाराजांनी ट्रस्टच्या कामच कौतुक केलं आणि महाराजांना ट्रस्ट सामाजिक क्षेत्रात नक्कीच भरिव कार्य करेल असा शब्द दिला.
त्याच बरोबर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी एक खंत सुद्दा महाराजांसमोर व्यक्त केली की प्रामाणिक पणे काम करत असताना ट्रस्टच्यापदाधिकाऱ्यांना तसेच ब्लड बँक आणि रक्तदान शिबिरांमध्ये राजकीय किंवा राजकारणी या व्यक्ती किंवा पक्ष काही प्रमाणात दबावआणण्याचा प्रयत्न होत आहे असे महाराजांच्या निदर्शनास आणून दिल्यास यावर महाराजांचं उत्तर एक चेतना देणार होत..” मी कशासाठी आहे कधी पण काही अडचण आली तर मला कॉल करा मी आपल्या सोबत कायम आहे” अशी थाप दिली. तुम्ही रक्तदानाची जी युवकांची चळवळ उभी केली आहे आणि मार्गदर्शक म्हणून मी नेहमी तुमच्या सोबत असू असेहीयावेळी महाराजांनी आवर्जून सांगितले. भविष्यात नक्कीच श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट एक रक्तदानाच्या नवा पायंडा निर्माण करेल यात शंका नाही.
महाराजांसोबतच अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा राजेंद्रजी कोंढरे साहेब, मराठा महासंघाचे तसेच आमचे मार्गदर्शक मस्कर सर, भिगवण कमिटी, छावाचे तसेच मराठाक्रांती मोर्चाचे धनंजय जाधव, सोमनाथ लांबोरे, राजेश गर्जे यांच्याही हस्ते यावेळी अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. सर्वानी ट्रस्टचेआणि ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांचे मनापासून कौतुकही केले.