शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या कामाचे दिल्ली दरबारी शरद पवारांच्या दालनात कौतुक!

Spread the love

दिल्ली |  सध्या धावपळीच्या व अनिश्चित जीवनमानाचा काळात आरोग्याचे प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण होत असून उपचाराअभावी अनेकांना आजार आपल्या अंगावर काढून मृत्यूला सामोरे जावे लागत आहे अशा परिस्थितीत शिवसेना मदत कक्षाच्या वतीने सर्वसामान्य रुग्णांना देत असलेला मदतीचा हात कौतुकास्पद आहे असे मत राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. आज दिल्ली येथे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या अध्यक्ष मंगेश चिवटे यांनी शिवसेनेच्या वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने रुग्णांना केली जात असलेल्या मदतीची माहिती दिली यावर बोलताना शरद पवार म्हणाले की हॉस्पिटलचा वाढलेला खर्च व समाजात श्रीमंत व गरीब अशी वाढलेली दरी यामुळे गरिबांना उपचार घेणे अवघड झाले आहे शासनाच्या अनेक योजना योजनेची माहिती रुग्णांना माहीत नसते शासनाच्या अनेक योजना व आणि सामाजिक संस्थेच्या माध्यमातून रुग्णांना मदत केली जाते शिवाय चारीटेबल ट्रस्ट च्या हॉस्पिटल मधून दहा टक्के खाटा मोफत मिळतात या माध्यमातून रुग्णांना मोफत उपचार उपलब्ध करून देणे हे महत्त्वाचे काम शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष करत आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण आहे ही भूमिका घेऊनच कायमस्वरूपी देशाचे राजकारण केले आज त्याच विचारधारेवर मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना काम करत आहे.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून 100 अत्याधुनिक एम्बुलेंस महाराष्ट्रातील रुग्णांच्या सेवेत मोफत दिल्या ही गोष्ट अभिनंदनीय आहे असे शेवटी शरद पवार यांनी सांगितले वैद्यकीय मदत कक्षाचे पक्षप्रमुख मंगेश चिवटे हे मूळचे करमाळ्याचे असून यावेळी करमाळ्याच्या व सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणातील काही किस्से शरद पवारांनी शेअर केले विशेषता माढा लोकसभा मतदारसंघातून शरद पवारांना मिळालेली विक्रमी मते त्याची त्यांनी विशेष आठवण करून दिली करमाळ्यातील ऊस उत्पादक शेतकरी सुखी करायचा असेल तर तालुक्यातील सर्व साखर कारखाने पूर्ण ताकतीने चालले पाहिजेत अशी भावना शरद पवार यांनी शेवटी व्यक्त केली.

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.