महाराष्ट्रात श्रीमंत मराठा आमदारांमुळे मराठ्यांना आरक्षण भेटत नाही; प्रकाश आंबेडकर यांची टीका!

महाराष्ट्रात २८८ पैकी १८२ श्रीमंत मराठा आमदार आहेत. हे श्रीमंत आमदार नात्यागोत्यात राजकारण बंदिस्त करून गरिब मराठ्यांसह इतर सर्वांना व्यवस्थेतून बाहेर ठेवतात.
गरिब मराठ्यांसाठी हे लढत नाहीत. गरिब मराठ्यांनी श्रीमंतांविरुद्ध स्वतःचा लढाउभारावा, अन्यथा आरक्षणावर पाणी सोडावं लागेल अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे.