निमगाव केतकी व आसपासच्या परिसरात बफर झोन लागू; गावे पुढीलप्रमाणे!

Spread the love

बारामती | मा. श्री. दादासाहेब कांबळे, उपविभागीय दंडाधिकारी तथा INCIDENT COMMANDER बारामती उपविभाग बारामती या नात्याने संदर्भिय क्रमाक ४ अन्वये अहवाल प्राप्त झाल्याप्रमाणे इंदापुर तालुक्यामधील निमगाव केतकी या गावामध्ये- एक कोरोना विषाणू संक्रमित रुग्ण आढळला असून त्यास हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.

कोरोना विषाणूच्या प्रसाराचे माध्यम पाहता सदर विषाणूची लागण एका संक्रमित रुग्णाकडून अन्य व्यक्तीस /इसमास त्याच्या संपर्कात आल्याने होते. त्यासाठी त्या विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक आहे. या सर्व बाबीचा विचार करुन व सदर रुग्णाचे परिसरातील अनेक लोकांना बाधा होण्याची शक्यता असल्याने निमगाव केतकी हा भाग केद्रस्थानी धरुन निमगाव केतकी या महसूली गावाची संपूर्ण हद्द प्रतिबंधीत क्षेत्र (Containment Zone) व निमगाव केतकी हा भाग केंद्रस्थानी धरुन ५ कि. मी.परिसरातील पिटकेश्वर, गोंतडी, कचरेवाडी (निमगांव केतकी)व्या महसुली गावंची संपुर्ण हद्द हे बफर क्षेत्र म्हणून घोषीतकरीत आहे.

मा. भारत सरकारच्या सूचनाप्रमाणे प्रतिबंधीत व बफर क्षेत्राकरिता असलेल्या सूचनाप्रमाणे तात्काळ पुढील कार्यवाही करावी असे आदेश मा श्री दादासाहेब कांबळे यांनी दिले आहेत. त्याप्रमाणे इंदापूर तालुका तहसीलदार मा सोनाली मेटकरी हे पुढील कार्यवाही करीत आहेत व निमगाव केतकी व परिसरातील लोकांना प्रशासनाला मदत करण्याचे आव्हान ही करण्यात आले आहे.

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.