पवारसाहेबांना विचारा ते समाेरच हाेते; चुकीच्या गाेष्टींना मी थारा देत नाही, छ. उदयनराजे भोसले!

Spread the love

सातारा | बाळासाहेब ठाकरे माेठे हाेते, आहेत. त्यांच्याबद्दल कायमच आदर आहे. पवार साहेबांबराेबर मी काम केले आहे. त्यांचा स्वभाव मला माहिती आहे. जर शिवरायांचा अपमान झाला असता तर त्यांनी मला आवाज उठवायला नक्कीच सांगतिले असते. उदयनराजे काेणत्याही चुकीच्या गाेष्टीला थारा देत नाही हे लक्षात ठेवा असेही त्यांनी नमूद केले.

राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी कोणाचाही अपमान केलेला नाही. अन् छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान झाला असत तर मी काय गप्प बसलाे असताे का ? तिथल्या तिथे राजीनामा दिला असता, पण तसं काही झालंच नाही. मी काय तुम्हांला गप्प बसणाऱ्यांपैकी वाटलाे का पण जे घडलेच नाही त्याला राजकारणासाठीचा अँगल देऊ नका असे आवाहन आणि शपथविधीनंतरच्या निर्माण झालेल्या वादाबाबत खासदार उदयनराजे भाेसले यांनी दिल्लीत एका वृत्त वाहिनीशी बाेलताना स्पष्टीकरण दिले आहे.

दरम्यान यावेळी उदयनराजेंनी खासदार संजय राऊत हे महान व्यक्ती आहेत अशी टिप्प्णी करुन सेनेबराेबरच काॅंग्रेसवर निशाणा साधला.राज्यसभेचा नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सोहळा बुधवारी (ता.22) झाला. यावेळी महाराष्ट्रातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह भाजपचे नेते उदयनराजे भोसले, सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले खासदारकीची शपथ घेतली आहे. राजीव सातव यांची खासदारकीची मराठीतून शपथ घेतली आहे. कोरोनामुळे सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचं पालन करुनच हा कार्यक्रम झाला. हा कार्यक्रम राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांच्या दालनात झाला. उदयनराजे भोसले यांनी शपथ घेतल्यानंतर जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी जय शिवाजी असा जयघोष केला. त्यावर नायडू यांनी हे सभागृह नसून माझे दालन असल्याचे स्पष्ट करुन उदयनराजेंचे कान टाेचले.

शपथविधीनंतर जय भवानी, जय शिवाजी घोषणा देणाऱ्या उदयनराजेंचे व्यंकय्या नायडूंनी टाेचले कान दरम्यान या प्रकाराचा शिवप्रेमींनी साेशल मिडियावर निषेध व्यक्त केला. त्यातून राज्यात राजकारण पेटलं. खासदार संजय राऊत यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजांचा दिल्ली दरबारी अपमान झाला की नाही याचे प्रमाणपत्र कोणी द्यायचे? भाजपाचे या विषयावर तोंड बंद आंदोलन सुरू झाले आहे. तर संभाजी भिडे यांच्याकडून सांगली सातारा बंदची अदयाप घोषणा नाही असे ट्विट केले. दरम्यान आज (गुरुवार) दिल्लीत जे घडलेच नाही त्यावर काय बाेलायचे अशी प्रतिक्रिया खासदार उदयनराजे भोसले यांनी देत छत्रपती शिवाजी महाराजा यांच्या नावाने भरपूर राजकारण झालं.

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.