उदयनराजेंचा अवमानकारक उल्लेख; शिवधर्म फाऊंडेशन व उदयनराजे भोसले समर्थकांनी उद्योजकाला फासलं काळं!

Spread the love

इंदापूर | छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आणि भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांनी उद्योजक अशोक जिंदाल यांची कपडे फाडून त्यांच्या तोंडाला काळे फासले आहे. उदयनराजे भोसले यांना गुंड म्हणत जिंदाल यांनी त्यांच्याबाबत अवमानकारक शब्द वापरल्याने हे कृत्य केल्याचा दावा उदयनराजे समर्थकांकडून करण्यात येत आहे.

इंदापूर MIDC मध्ये अशोक जिंदाल यांची कंपनी आहे. याच अशोक जिंदाल यांनी उदयनराजेंवर टीका करणारा एक व्हिडिओ पोस्ट केल्याचं बोललं जात आहे. या व्हिडिओत त्यांनी उदयनराजे यांचा साताऱ्याचा गुंड असा उल्लेख केल्याचा दावाही करण्यात आला. त्यामुळे इंदापुरात जिंदाल यांना काळं फासत त्यांची धिंडही काढण्यात आली आहे.

उदयनराजेंचा अपमान झाल्याचं सांगत अशोक जिंदाल यांना काळे फासणारे तरुण हे शिवधर्म फाऊंडेशनचे कार्यकर्ते आहेत. शिवधर्म फाऊंडेशनमध्ये काम करणारे हे कार्यकर्ते उदयनराजे भोसले यांचे खंदे समर्थक आहे. अशोक जिंदाल यांना मारहाण केल्यानंतर या कार्यकर्त्यांनी त्यांना पोलिस स्थानकातही नेलं आणि उदयनराजेंचा अपमान केल्याबद्दल जिंदाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणीही पोलिसांकडे केली.

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.