नवी दिल्ली | जगातील सर्वात मोठी लोकशाही असणारा देश म्हणजे आपला भारत. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. प्रत्येक वर्षी मोठ्या उत्साहात हा दिवस देशभरात साजरा केला जातो. दिल्ली येथील लाल किल्ल्यावर देशाचे पंतप्रधान देशाचा झेंडा फडकवतात. आज देशाच्या ७४ व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ध्वजारोहण केले.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मोजक्या मंडळींच्या उपस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 74 व्या स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मोदींनी सलग सातव्यांदा लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले. लष्करी महिला अधिकारी मेजर श्वेता पांडे यांनी ध्वजारोहण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची साहय्यता केल्याचे पाहायला मिळाले. यावेळी विशेष म्हणजे ध्वजारोहण समारंभाच्या वेळी लष्करी महिला अधिकाऱ्याला मोठा सन्मान मिळाल्याचे पाहायला मिळाले. भूदलाच्या लष्करी महिला अधिकारी मेजर श्वेता पांडे यांनी मोदींनी ध्वजारोहणा वेळी सहाय्यता केली. श्वेता पांडे 2012 मध्ये लष्करात सहभागी झाल्या. लखनऊमधील सिटी मांटेसरी स्कूलमधून त्यांनी शिक्षण घेतले आहे. कंम्पुटर सायन्समध्ये त्यांनी बीटेकचे शिक्षण पूर्ण केले आहे.
यंदाच्या वर्षी मास्कोमध्ये विजय दिवस परेडमध्ये देखील श्वेता पांडे या भारतीय सैन्य तुकडीच्या हिस्सा होत्या. मेजर श्वेता पांडे भारतीय सेनेच्या 505 बेस वर्कशॉप विभागात ईएमई म्हणजेच इलेक्ट्रोनिक आणि मॅकेनिकल इंजीनियरिंग कोरच्या अधिकारी पदावर कार्यरत आहेत. 233 फील्ड बॅटरी तोफ चालवणाऱ्या जवानांनी 21 तोफांची सलामी दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ध्वजारोहण केले. सेरेमोनियल बॅटरीची धूरा लेफ्टनंट कर्नल जितेंद्र सिंह मेहता आणि गन पोजिशन ऑफिसर नायब सूबेदार (एआयजी) अनिल चंद यांनी सांभाळली.