भिगवण मधील पोंधवडी गावामध्ये “माझे कुटुंब माझी जबाबदारी” अभियानाला सुरुवात डाॅ मृदुला जगताप !

भिगवण | प्रतिनिधी डाॅ तुळशीराम खारतोडे
प्राथमिक आरोग्य उपकेंद्र तकारवाडी अंतर्गत ग्रामपंचायत पोंधवडी च्या वतीने गावामध्ये माझे कुटुंब माझी जबाबदारी या अभियानाची सुरुवात मा सरपंच नानासाहेब बंडगर यांच्या हस्ते थर्मल गण प्लस आॅकसीमीटर च्या साह्याने करण्यात आली, यावेळी मा सरपंच नानासाहेब बंडगर तंटामुक्त समितीचे अध्यक्ष डाॅ खारतोडे मा उपसरपंच दत्तात्रय पवार संजय भोसले डाॅ मृदुला जगताप शरद ससाणे उषा यादव आशा अनिता काशिद व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पोंधवडी मधील शिक्षक यांच्या साह्याने करण्यात येत असल्याची माहिती डाॅ मृदुला जगताप यांनी दिली.
दोन दिवसात 16 जनांच्या साह्याने पोंधवडी गावातील सर्व ग्रामस्थांचा सर्वे करण्यात येणार आहे तसेच ग्रामपंचायत पोंधवडी च्या वतीने सॅनीटायझर ग्लोज स्पेशलीड 95 मास्क प्लस आॅकसीमीटर थर्मल गण देण्यात आले असल्याची माहिती डाॅ मृदुला जगताप यांनी दिली.