दिल्लीच्या तक्ताखाली झुकन रक्तातच नाही; मुंबई इंडियन्स ने जिंकली आयपीएल 2020 ची ट्रॉफी!

Spread the love

दुबई | रोहित शर्माच्या मुंबई ने पुन्हा एकदा आपणच आयपीएलचे किंग असल्याचं सिद्ध केलं आहे. दिल्ली विरुद्धच्या फायनलमध्ये मुंबईचा दणदणीत विजय झाला आहे. या मॅचमध्ये कर्णधार रोहित शर्मा ने केलेल्या धडाकेबाज अर्धशतकाच्या जोरावर मुंबईने पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. दिल्लीने दिलेल्या 157 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात धडाक्यात झाली. डिकॉक आणि सूर्याने मुंबईला 4.1 ओव्हरमध्येच 45 रनची ओपनिंग पार्टनरशीप करून दिली. रोहित शर्माने 51 बॉलमध्ये 68 रनची खेळी केली.

या मॅचमध्ये दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, पण मुंबईच्या ट्रेन्ट बोल्टने पुन्हा एकदा दिल्लीला सुरुवातीलाच धक्के दिले. मार्कस स्टॉयनिस मॅचच्या पहिल्याच बॉलला आऊट झाला, यानंतर पुढच्याच ओव्हरला बोल्टने रहाणेला माघारी धाडलं. तर जयंत यादवने शिखर धवनला बोल्ड करून दिल्लीची अवस्था 22-3 अशी करुन ठेवली. यानंतर मात्र कर्णधार श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांनी सूत्र हातात घेतली. या दोघांमध्ये 96 रनची पार्टनरशीप झाली.

मुंबईची टीम 13 आयपीएलमध्ये सर्वाधिक पाचव्यांदा चॅम्पियन ठरली आहे. याआधी 2013, 2015, 2017, 2019 आणि आता 2020 साली मुंबईने आयपीएल ट्रॉफी पटकावली आहे. लागोपाठ 2 आयपीएल जिंकण्याच्या चेन्नईच्या रेकॉर्डशीही मुंबईने बरोबरी केली आहे. याआधी चेन्नईने 2010 आणि 2011 साली आयपीएल जिंकली होती.

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.