मराठा आरक्षणकडे शरद पवारांचा कानाडोळा, म्हणूनच मराठा समाजाची ही अवस्था; विनायक मेटे यांची टीका?

Spread the love

नवी  दिल्ली | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अशोक चव्हाण यांची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी  तत्काळ बैठक बोलवावी अशी मागणी शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष आ. विनायक मेटे यांनी केली आहे. सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाच्या प्रकरणी 26 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर या मागणीला महत्त्व आले आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकार बेफिकीर असल्यासारखा वागत असून सरकार हे आरक्षणाबाबत गंभीर नाही  अशी टीका त्यांनी केली. शरद पवारांनी मनावर घेतलं असतं तर मराठा आरक्षणाचा प्रश्न केव्हाच मार्गी लागला असता असं मतही त्यांनी व्यक्त केलं. मेटे पुढे म्हणाले,  मराठा आरक्षणासंदर्भात जेव्हा सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू झाली होती तेव्हा ही सुनावणी आभासी घेऊ नये अशी मागणी राज्य सरकारकने करावी यासाठी शिवसंग्रााम पक्ष आणि मराठा समाजाच्या वतीने आग्रह धरण्यात आला होता. मात्र सरकारने या मागणीकडे दुर्लक्ष केलं जेव्हा सरकारवर दबाव वाढला तेव्हा त्यांनी शेवटी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या सुनावणीला विरोध केला.

गेल्या अनेक वर्षापासून शरद पवार यांना राज्यात जाणता राजा म्हणून ओळखले जाते मात्र मराठा समाजाच्या एवढ्या मोठ्या गंभीर प्रश्नावर त्यांनी कधीही वक्तव्यं दिलं नाही सोबतच राज्य सरकारच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या मराठा आरक्षणाच्या बैठकीमध्ये ते कधीच उपस्थित राहिले नाही. शरद पवार यांनी पुढाकार घेतला असता तर मराठा आरक्षणाचा मार्ग केव्हाच मार्गी लागला असता.
राज्यातील महाआघाडी सरकारला दिशानिर्देश देण्याचे काम शरद पवार करतात त्यामुळे शरद पवार यांनी मराठा आरक्षणाबाबत काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण आणि महा विकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बैठक बोलावून मराठा आरक्षण टिकविण्यासाठी राज्य सरकारने सर्वशक्ती पणाला लावावी अशी मागणीही आमदार मेटे यांनी केली.

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.