महाराष्ट्रात मृत्यू तांडव थांबेना; विरारमधील कोव्हिड रुग्णालयातील ICU विभागात आग, 13 जणांचा होरपळून मृत्यू!
विरार | विरारच्या विजयवल्लभ रुग्णालयात काल मध्यरात्रीच्या सुमारास ICU वॉर्ड मध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली असून या दुर्घटनेत १० ते १२ जणांचा आगीमुळे होरपळून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.. या घटनेची माहिती हॉस्पिटल प्रशासनाने वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन पथकाच्या जवानांना दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. त्याच सोबत रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना तातडीने दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे.मात्र या संपूर्ण घटनेमुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज
वसईतील वल्लभ कोव्हिड रुग्णालयातील ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या रुग्णालयाचे फायर ऑडिट झाले नव्हते, असेही बोललं जात आहे. मात्र अद्याप याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. ही आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी रवावा झाल्या आहेत. तसेच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आहेत.
आयसीयू वॉर्डात भीषण आग
मिळालेल्या माहितीनुसार, विरार पश्चिमेकडे विजय वल्लभ नावाचे कोव्हिड रुग्णालय आहे. या रुग्णालयातील अतिदक्षता (ICU) विभागात आज रात्री 3 ते 3.30 च्या दरम्यान भीषण आग लागली. यावेळी रुग्णालयात 90 जण उपचार घेत होतं. तर आयसीयू वॉर्डमध्ये जवळपास 17 रुग्ण उपचार घेत होते. यातील 13 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची नावे
उमा सुरेश कनगुटकर – स्त्री
निलेश भोईर – पुरुष
पुखराज वल्लभदास वैष्णव – पुरुष
रजनी आर कडू – स्त्री
नरेंद्र शंकर शिंदे – पुरुष
कुमार किशोर दोषी – पुरुष
जनार्धन मोरेश्वर म्हात्रे – पुरुष
रमेश टी उपायन – पुरुष
प्रवीण शिवलाल गौडा – पुरुष
अमेय राजेश राऊत – पुरुष
शमा अरुण म्हात्रे – स्त्री
सुवर्णा एस पितळे – स्त्री
सुप्रिया देशमुख – स्त्री
सध्या ही आग पूर्णपणे विझवण्यात आली असून कुलिंग ऑपरेशन सुरु आहे. तसेच या रुग्णालयातील सर्व रुग्णांना वसई-विरार- नालासोपारा परिसरातील विविध रुग्णालयात हलवण्यात येत आहे.
हितेंद्र ठाकूर यांची प्रतिक्रिया
या रुग्णालयात centralized ac होता, त्याचा स्फोट झाला. त्यावेळी आयसीयूत 17 रुग्ण होते. त्यातील 13 जणांचा मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर आहेत. मी रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांची चौकशी केली. रात्री जवळपास दीड ते दोन वाजता ही घटना घडली. एकूण 90 रुग्ण होते. फायर ऑडिट वैगरे हा मुद्दा पुढचा आहे. मी आता इथे कोणाला काही मदत करता येते का हे बघायला आलो आहे. हे प्रश्न घेऊन बसणं किंवा मदत करणं हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आतमधील परिस्थिती वाईट आहे. एका स्फोटात 13 जणांचा मृत्यू होतो. याचा अर्थ दुसरा मजला हा पूर्णपणे जळून खाक झाला आहे, अशी माहिती वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी दिली.