Spread the love

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांनी शुक्रवारी रात्री सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. “आधी जीव वाचले पाहिजे, मग पुढचं बघू, आज पूर्ण लॉकडाऊन  इशारा देतोय. पुढील दोन दिवसात दुसरा पर्याय दिसला नाही तर जग जे करतंय तोच पर्याय स्वीकारावा लागेल”, असा थेट इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊनशिवाय जो पर्याय असेल तो सांगा, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री विविध क्षेत्रातील तज्ज्ञांशी बातचीत करणार आहेत. जर पर्याय मिळाला तर लॉकडाऊन लावला जाणार नाही, मात्र पर्याय नसेल तर लॉकडाऊन नक्की असेल, हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं होतं. आता मुख्यमंत्र्यांनी एकप्रकारे लॉकडाऊनचा इशारा दिल्यामुळे कडक निर्बंध लागणार हे निश्चित आहे. 4 एप्रिल 2021 म्हणजेच उद्याच्या रविवारपासून महाराष्ट्रात हे कडक निर्बंध किंवा लॉकडाऊन लावला जाऊ शकतो.

काय असू शकतात नव्या लॉकडाऊनचे नियम?
 1. महाराष्ट्रात सध्या सुरु असलेल्या रात्रीच्या जमावबंदीमध्ये आणखी वाढ होऊ शकते. सध्या रात्री 8 ते सकाळी 7 पर्यंत जमावबंदी आहे. हा वेळ वाढवून पुण्याप्रमाणे संध्याकाळी 6 ते सकाळी 6 अशी संचारबंदी लागू शकते
 2.  मॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स, मल्टिप्लेक्स, नाट्यगृह पूर्णत: बंद ठेवण्याची शक्यता
 3.  भाजीमार्केट आणि भाजीपाल्याची दुकानं मर्यादित वेळेतच सुरु ठेवण्याची चिन्हं
 4. पुण्यात ज्याप्रमाणे दिवसा जमावबंदी आहे, त्याप्रमाणेच मुंबईसह महाराष्ट्र किंवा कोरोनाचा उद्रेक असलेल्या जिल्ह्यांमध्ये दिवसा जमावबंदी लागू होऊ शकते.
 5.  खासगी कर्मचाऱ्यांना, ज्यांना शक्य आहे, त्या कंपन्यांना सक्तीने वर्क फ्रॉम होमचे आदेश दिले जाऊ शकतात
 6.  शासकीय कार्यालयात, अत्यावश्यक सोडून 25 टक्केच कर्मचाऱ्यांची उपस्थिती
 7.  अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकल प्रवासाची मुभा
 8.  आंतरजिल्हा बसेस सुरु,मात्र आधी कोरोना चाचणी, मगच प्रवास असे निर्बंध लागण्याची शक्यता
 9.  शाळा-कॉलेज वा ट्यूशन क्लासेस बंद, त्याऐवजी ऑनलाईनचा पर्याय
 10. सर्व धार्मिक स्थळं काही दिवस पुन्हा बंद ठेवण्याची शक्यता आहे
 11. राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंट, बार हे बंद ठेवून केवळ पार्सल सुविधा सुरु राहण्याची शक्यता आहे.
 12. पुण्यात ज्याप्रमाणे बससेवा 7 दिवसांसाठी बंद ठेवण्यात आली आहे, त्याप्रमाणे मुंबई लोकलमधील प्रवाशांवर निर्बंध येऊ शकतात.

लस म्हणजे धुवाँधार पावसातील छत्री, पण आत्ता पाऊस नाही तर वादळही

उद्धव ठाकरे म्हणाले, “कोरोना लस ही धुवाँधार पावसात छत्री असावी तशी आहे. पण आत्ता केवळ पाऊस नाही तर वादळही आहे. या वादळाच्या स्थितीत लस घेणं ही आपल्याकडील छत्री आहे. त्यातल्या त्यात कमीत कमी भिजावं म्हणून कोरोना लसीचा उपयोग होणार आहे. लस घेणं, चाचण्या वाढवणं हा उपाय मी मानायला तयार नाही. कारण जितक्या चाचण्या होतात तितकी रुग्णसंख्या कळायला मदत होते, परंतू रुग्णवाढ थांबवण्यासाठी कुणी उपाय सांगत नाही.”

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.