महाराष्ट्रातील देवींची साडेतीन पीठांचं महत्व आणि त्यांच्याबद्द्लच्या आख्यायिका काय आहेत; जरूर वाचा!

Spread the love

भारतातील हिंदू संस्कृतीमध्ये धार्मिक स्थळांना खूप महत्त्व असते. प्रत्येक धार्मिक स्थळाचे एक वेगेळे वैशिष्टय आणि इतिहास असतो. त्यामुळे लोकांच्या मनामध्ये या धार्मिक स्थळांचे एक स्थान निर्माण झालेले असते. लोक मोठ्या आशेने आणि श्रद्धेने या धार्मिक स्थळांवर जाऊन नतमस्तक होतात. याच धार्मिक स्थळांपैकी आहेत, आपल्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध साडेतीन शक्तिपीठे. या शक्तीपिठांचे मह्त्व देखील मोठे आहे. या तीर्थक्षेत्रांवर दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून येत असतात. महाराष्ट्राच्या कोल्हापूर, तुळजापूर, माहूर आणि नाशिक या ठिकाणांवर ही शक्तिपीठे आहेत. देवींची ही शक्तिपीठे संपूर्ण देशामध्ये प्रसिद्ध आहेत. या साडेतीन पीठांचं महत्व आणि त्यांच्याबद्द्लच्या आख्यायिका काय आहेत याची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

१. महालक्ष्मी मंदिर, कोल्हापूर
कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी देवीचे मंदिर हे पूर्ण शक्तीपीठांपैकी एक आहे. या मंदिराचे बांधकाम कोणी केले, याचा निष्कर्ष अजूनही काढता आलेला नाही. काही संशोधकांनी असे म्हटले आहे की, शिलाहार राजवटीपूर्वी कार्हारक (आजचे कराड) येथील सिंध वंशातील राजाने हे मंदिर बांधलेले आहे. कोल्हापूरचे शिलाहार देवतेचे भक्त होते आणि देवतांनी त्याला आशीर्वाद दिल्याचे येथे अनेक काळ नोंदवले गेले आहे. सातव्या शताब्दीपासून चालुक्य राजघराण्यातील राजा कर्ण दिव यांनी या मंदिराला घडवले होते.
अनेक संशोधकांचे असे म्हणणे आहे कि, सध्याच्या मंदिराची प्राचीन रचना चालुक्य कालखंडात झाली आहे. या मंदिराची मुख्य रचना दोन मजली आहे. हे मंदिर कोल्हापूरच्या परिसरात आढळणाऱ्या काळ्या दगडापासून बनवण्यात आलेले आहे. महालक्ष्मीची मूर्ती १.२२ मीटर उंच आहे आणि एका ०.९१ मीटर उंच काळ्या दगडावर ठेवण्यात आली आहे. या मंदिरामध्ये घाती दरवाजा, गरुड मंडप इत्यादी कोरीव केलेल्या रचना आहेत. या मंदिरातील गरुड मंडप आणि सभा मंडप हे १८४४ ते १८६७ च्या दरम्यान बनवले गेले आहे. येथे भक्त मोठ्या संख्येने येतात. या मंदिरामध्ये जवळपास २० पुजारी आहेत, जे पारंपारिक विधीपूर्वक देवीची पूजा करण्यात पारंगत आहेत. प्रत्येक शुक्रवारी देवीच्या प्रतिमेची मिरवणूक काढली जाते.

२. श्री क्षेत्र तुळजापूर, तुळजाभवानी
भारतातील शक्तिदेवताच्या पीठापैकी साडे तीन पीठे महाराष्ट्रात आहे. त्यातील श्री क्षेत्र तुळजापूर हे पूर्ण व आद्यपीठ मानले जाते.
महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यात वसलेले तुळजापूर हे महत्वाचे तीर्थक्षेत्र असून त्याठिकाणी तुळजाभवानी देवीचे प्राचीन मंदिर आहे.
स्कंद पुराणातील सह्याद्री विभागात या देवतेची कथा आहे. कृतयुग म्हणजेच जवळपास १७,२८०० वर्षापूर्वी जेव्हा ऋषी कर्दमाची पत्नी अनुभूती ध्यान करत होती. तेव्हा कुकर राक्षसाने तिला मारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिला स्वत: ला त्या राक्षसापासून वाचवण्यासाठी तिने भगवती देवीचा धावा केला. त्यावेळी देवी भगवती प्रकटली आणि त्याच्याशी लढाई करून त्या राक्षसाला ठार मारले.
त्यानंतर अनुभूतीच्या विनंतीमुळे देवी डोंगरावर राहण्यास तयार झाली. या देवीला तुर्जा-तुळजा (भवानी) असेही म्हटले जाते. या देवीचे जे भक्त तिचा धावा करतात, त्यांची इच्छा देवी पूर्ण करते. देवीचे मंदिर बालाघाटावरील एक डोंगरमाथ्यावर आहे मंदिराच्या काही भागांची बांधणी हेमाडपंती आहे. महाराष्ट्रातील या देवतांना विशेष महत्त्व आहे आणि नवरात्रीचा उत्सवही जरी नऊ दिवसांचा असला तरी
तुळजापुरात, हा उत्सव एकवीस दिवस चालतो. तुळजाभवानी देवीच्या आशीर्वादाने शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा मिळाली होती. मंदिराच्या दक्षिणेकडील प्रवेशद्वाराला परमार दरवाजा म्हणतात. दरवाजावर एक आज्ञापत्र ठेवण्यात आले आहे ज्यात असे म्हटले आहे की, जगदेव परमार नावाच्या एका महान भक्ताने सात वेळा देवतेच्या चरणी प्रार्थना केली.

३. रेणुकादेवी, माहूर
देवीच्या पूर्ण जगत् शक्तीपीठांपैकी माहूरची देवी रेणुकामाता ही एक आहे. तिला श्री परशुरामची आई म्हणून ओळखले जाते. ती महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांची संरक्षक देवी आहे. असे म्हणतात की हे मंदिर तेराव्या शतकात देवगिरीच्या यादव राजाने बांधले होते. माहूर येथील किल्ल्यात देवीच्या मंदिरासह इतर देवांचे देखील मंदिर आहे. जसे, परशुराम मंदिर, दत्तात्रय मंदिर, अनासू मंदिर, कालिकामाता मंदिर इ. येथील भक्त हे मानतात की, भगवान दत्तात्रेय येथे जन्मले होते. रामगड किल्ला हा माहूरच्या जवळपास आहे आणि त्यामध्ये सुंदर कोरीव काम केलेल्या लेणी देखील आहेत. हे ठिकाण नांदेड जिल्ह्याच्या माहूर तालुक्यामध्ये आहे.

४. सप्तशृंगीदेवी, वणी
या सप्तश्रुंगीला या साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्ध्या शक्तीपिठाचा मान मिळाला आहे. येथे महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती या तिघींचेही हे एकच रूप आहे, असे मानले जाते. या पृथ्वीवर जगदंबेची वेगवेगळी रूपे आहेत. त्यापैकी सप्तशृंगीदेवीचे रूप या तीन देवींचे एक रूप आहे. असे म्हटले जाते की, शुंभनिशुंभ आणि महिषासुर या राक्षसांचा नाश केल्यानंतर देवी येथे तप आणि साधना करायला राहत होती. या उंच सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये येथे सात उंच शिखरे आहेत, त्यावरूनच या ठिकाणाचे नाव सप्तशृंगी गढ पडले आहे. हिंदू पंचांगनुसार प्रत्येक नवरात्र आणि चैत्र महिन्यामध्ये येथे एक सुंदर कार्यक्रम आयोजला जातो. सप्तशृंगीदेवी नाशिकपासून ६५ किलोमीटरवरील ४८०० फूट उंचीवरील सप्तशृंगगडावर वसलेली आहे या देवीच्या मुर्तीविषयी देखील एक गोष्ट आहे, जी भाविकांकडून मोठ्या भक्तीभावाने सांगितली जाते. एका धनगराला दिसलेले मधमाशांचे पोळे काढण्यासाठी त्याने त्यात काठी खुपसली तेव्हा काठीला शेंदूर लागला. त्याने पोळे काढल्यानंतर तेथे देवीची मूर्ती सापडली, अशीही एक दंतकथा आहे. येथील निसर्गाचे रूप रम्य आहे. डोंगराची कपार खोदून तयार केलेल्या महिरपीत देवीची आठ फूटी मूर्ती आहे. तिला अठरा भुजा आहेत. मूर्ती शेंदूरअर्चित असून, रक्तवर्ण आहे. डोळे टपोरे व तेजस्वी आहेत. सर्व हात एकमेकांना लागून आहेत.

सर्व देवांनी महिषासुराशी लढण्यासाठी देवीला शस्त्रे दिली होती.
अशी ही महाराष्ट्रातील देवींची साडे तीन शक्तिपीठे खूपच जागृत देवस्थाने मानली जातात. येथे जाऊन देवीचे भक्त मोठ्या भक्तिभावाने देवीची सेवा करतात आणि आपल्या मनातील भावना देवीसमोर मांडतात.

सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके,*
शरण्ये त्र्यम्बके गौरी, नारायणी नमोस्तुते..*
आई जगदंबेची अखंड कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबियांवर राहो,*
आणि तुम्हा सर्वांचे जीवन आनंदमय आणि*
सुखमय होवो, अशी श्री आई जोगेश्वरीमाता चरणी प्रार्थना..!*

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.