शासन पूर्ण ताकदीने शेतकऱ्यांच्या पाठीशी-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे!

Spread the love

 

परवेज मुल्ला
उस्मानाबाद | शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील पूरपरिस्थिती पाहणी दौऱ्यादरम्यान काटगाव ता.तुळजापूर येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली.

तसेच यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकरी आणि ग्रामस्थांशी संवाद साधून शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये धीर धरावा हे शासन पूर्ण ताकदीने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असून शेतकऱ्यांचे आयुष्य चांगले होईल अशी मदतीबाबत या शासनाकडून मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकरी बांधवांना दिली.

यावेळी महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात, रोहयो व फलोत्पादन मंत्री ना.संदिपान भुमरे, जिल्ह्याचे पालकमंत्री ना.शंकरराव गडाख-पाटील, जिल्ह्याचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ.ज्ञानराज चौगुले, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आ.कैलास घाडगे-पाटील, माजी आ.ज्ञानेश्वर पाटील, शिवसेना नेते शंकाराव बोरकर, नगराध्यक्ष नंदूभैय्या राजेनिंबाळकर, सुनिल चव्हाण, महिला आघाडी श्यामलताई वडने, शिवसेना तालुकाप्रमुख सतिषकुमार सोमाणी, जगन्नाथ गवळी, विभागीय सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, पोलीस अधीक्षक राज तिलक रोशन यांच्यासह शेतकरी, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.